Nail Polish: मुलींकडे विविध रंगांतील नेल पॉलिशचा संग्रह असतो. नेल पॉलिश फक्त नखांना सुंदर बनविण्याचे काम करत नाही तर नेल पॉलिशच्या मदतीने घरातील अनेक कामेदेखील सोपी करता येऊ शकतात. 


त्वचेवरील अॅलर्जी दूर करण्यास मदत
दागिने काळे झाल्यावर ते परिधान केले तर त्वचेवर अॅलर्जी होत असते. त्यामुळे दागिन्यांचा जो भाग त्वचेच्या संपर्कात येतो त्यावर पारदर्शक नेल पॉलिश लावावी. असे केल्यास दागिने सुरक्षित राहतात व काळेदेखील होत नाहीत. यामुळे त्वचेवर कोणत्याही प्रकारची अॅलर्जी होत नाही. 


मॅचिंग दागिने 
अचानक बाहेर जाताना ड्रेसला मॅचिंग दागिने मिळत नाहीत. अशावेळेस नेल पॉलिशने ड्रेसच्या रंगानुसार पेंट करावे. असे केल्यास तुम्हाला मॅचिंग ज्वेलरी खरेदी करण्याची गरज भासणार नाही. 


बटन तुटल्यावरचा उपाय 
ड्रेस किंवा शर्टाचे बटन धावपळीच्या वेळेस तुटते. त्यामुळे इतरांसमोर लाज वाटते. अशावेळेस कोणत्याही रंगाचे बटन घेऊन शर्टाला मॅचिंग नेल पॉलिशने पेंट करावे. असे केल्यानंतर कपडे धुण्याआधी ते बटन काढून ठेवावे. नाहीतर शर्टाला नेट पॉलिशचा रंग लागू शकतो. 


BMW कारपेक्षाही या आहेत महागड्या नेल पॉलिश!


Red Carpet नेल पॉलिश: किंमत $1000 हजार डॉलर


Iced Manicure नेल पॉलिश: किंमत $51,000 हजार डॉलर


ऐले कॉस्मेटिक ची 'I Do' नेल पॉलिशची किंमत $55000 हजार डॉलर आहे. ही नेल पॉलिश परदेशात बरीच प्रसिद्ध आहे.


महागड्या नेलपॉलिशमध्ये 'गोल्ड रश कोचर'चा नंबर लागतो. याची किंमत $130,000 लाख डॉलर आहे. या नेल पॉलिशमध्ये सोनं आणि हिऱ्याचे अंश आहेत.


संबंधित बातम्या


Health Care Tips : फिट राण्यासाठी घरी करा हा व्यायाम; जिममध्ये जाण्याची गरज नाही


Fridge Cleaning Tips : फळं आणि भाज्या ठेवण्याआधी असा स्वच्छ करा फ्रीज; बॅक्टेरिया होतील दूर


Weight Loss Tips: डाएटिंग न करता कमी करा वजन; जाणून घ्या सोपी ट्रिक


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha