Stiff Person Syndrome : तुम्हाला नेहमी शरीरात आकडी आल्यासारखं जाणवतं का? मग तुम्हाला स्टिफ पर्सन सिंड्रोम (Stiff Person Syndrome) आजार असू शकतो. या आजारात तुमच्या शरीरातील नसांमध्ये वेदना जाणवतात. यामुळे शारीरिक हालचाल मंदावते आणि चालणं फिरणं अवघड होऊन जातं. या सिंड्रोममुळे पाठीचा कणा आणि मज्जासंस्थेवर परिणाम होतो. याकडे बरेचजण साधा शारीरिक थकवा समजून दुर्लक्ष करतात. पण याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे वेळीच चांगल्या डॉक्टारांचा सल्ला घ्यायला हवा. कारण कधी कधी हा न्यूरॉलॉजिकल आजार असू शकतो. हा आजार गंभीर रूप धारण करण्याधी सावध होण्याची आवश्यकता आहे. या आजाराविषयी सविस्तपणे जाणून घेऊया...
स्टिफ पर्सन सिंड्रोम
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर अॅन्ड स्ट्रोक या अमेरिकन विभागाच्या म्हणण्यानुसार, स्टिफ पर्सन सिंड्रोम एक न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर आहे. या आजारात प्रामुख्याने मेंदू, पाठीचा कणा आणि मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम होतो. या आजारात तुम्हाला शरीरात सारखं त्रास जाणवतो. त्यामुळे चालताना वेग मंदावतो. हा आजार 20 लाख लोकांमधून एका व्यक्तीला होऊ शकतो. पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये लहान मुलांनाही आजार होऊ शकतो. या आजारांचा सामना करणाऱ्या लोकांना मोठा आवाज आणि मानसिक तणाव सहन होत नाही. त्यामुळे अनेक गंभीर समस्येला सामोरे जावं लागू शकतं. या आजारांनी अनेक बडे सेलिब्रेटीही पीडित आहेत. हॉलिवूड सिंगर सिलिन डिओन हे सुद्धा या आजारानं पीडित आहेत. या आजारामुळे गायक सिलिन यांना नीट चालतासुध्दा येत नाही. त्यांच्या शरीरातील नसा कमजोर झाल्या आहेत. यामुळे त्यांच्या गायकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते आता पूर्वीसारखं गायन करू शकत नाहीत. यावरून हा आजार किती गंभीर आहे हे कल्पना केलं, तर लक्षात येईल. या आजारात कधी कधी शरीराचा एखाद्या भागाला लकवाही मारू शकतो. त्यामुळे न्यूरॉलॉजिस्टचा वेळेत सल्ला घ्या.
या आजाराची लक्षणे जाणून घ्या :
या प्रकारच्या रूग्णांमध्ये पाठी कणा आणि मज्जासंस्थेवर परिणाम होतो. तसेच या प्रकारच्या रूग्णांमध्ये सुरूवातीला स्नायूंमध्ये आकडी आल्यासारखं होतं. यानंतर हा आजार हळूहळू पायातील स्नायूंपर्यंत पोहोचतो आणि स्नायूंचा कडकपणा वाढतो. त्यामुळे कधी कधी चालताना लंगडत चालावं लागतं. वेळेत उपचार न केल्यामुळे हा आजार हात आणि चेहेऱ्यापर्यंत जातो. एखाद्या व्यक्तीला शरीराच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला नेहमी वेदना जाणवायला लागतात. काही काळानंतर व्यक्तीला जागचं हलतासुद्धा येत नाही. काही महिन्यानंतर व्यक्तीला इतक्या वेदना होऊ लागतात की, त्याचं उठणं आणि बसणं अवघड होऊ जातं. शरीरातील नसांचा कडकपणा कमी करण्यासाठी खास ट्रीटमेंट घ्यावी लागते. बऱ्याच वेळा या आजारात पाठीचा कणा आणि मानही दुखते. यासाठी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. सध्या या आजारावर संशोधन सुरू आहे. या आजाराविषयी काही मेडिकल रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, हा एक ऑटोइम्यून आजार आहे. जो शरीरातील प्रतिकारशक्तीचं संरक्षण करणाऱ्या यंत्रणेचं नुकसान करतो. यामुळे व्यक्तीची शारीरिक हालचाल मंदावते.
इतर बातम्या वाचा :