Stay Healthy in September : बदलत्या ऋतूत तब्येतीची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे नुकताच सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. त्यामुळे वातावरणात बदल होताना पाहायला मिळत आहे आता पाऊस कमी होऊ लागलाय. मधेच ऊन पडताना दिसत आहे. या बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तब्येतीची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही योग्य अन्नपदार्थांचे सेवन करून आरोग्याची नीट काळजी घेऊ शकता, यामुळे तुमचं शरीर निरोगी राहील. आता हळूहळू गुलाबी थंडीची चाहूल लागेल, त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी खालील प्रकारे आरोग्याची काळजी घ्या. असं केल्यास हिवाळा येईपर्यंत तुमचे शरीर व्हायरल आजार, सर्दी, फ्लू, ताप पसरवणाऱ्या विषाणूंशी लढण्यासाठी तयार होईल.


'या' अन्नपदार्थांचा समावेश करा. 


1. हिरव्या पालेभाज्या खा.


ऑगस्ट महिन्यामध्ये खूप पाऊस पडतो. त्यामुळे आहारात डॉक्टरांकडून वांगी, पालक आणि हिरव्या भाज्या खाण्यास मनाई केली जाते. कारण अशा भाज्यांसोबत विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश करण्याची शक्यता असते. मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे तुम्ही आहारात पुन्हा हिरव्या भाज्यांचा समावेश करू शकता. या ऋतूत हिरव्या भाज्या खाणं तुमच्या शरीरासाठी लाभदायक ठरेल. पालक किंवा त्यासारख्या हिरव्या भाज्या खाल्ल्याने शरीराला योग्य पोषण मिळेल.


2. रताळ्याचा आहारात समावेश करा.


तुम्ही या महिन्यात रताळ्या खाऊ शकता. सप्टेंबर महिन्यात रताळे खाल्ल्याने आरोग्याला फायदा मिळेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा रताळ्याचे सेवन नक्की करा. त्यामुळे तुमच्या शरीराला योग्य पोषकतत्वं मिळतील. थंडीच्या येणाऱ्या मोसमासाठी शरीराला रोगप्रतिक्रार शक्ती वाढवण्यास मदत मदत होईल. ज्यांना खूप थंडी वाजते, त्यांनी रताळ्याचे सेवन जरूर करावे. कारण यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि आयरन चांगल्या प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराला थंडीशी लढण्याची ताकद मिळते.


3. सुके खजूर खायला सुरुवात करा.


सुके खजूर हे एक ड्रायफ्रूट आहे, ज्याला तुम्ही ड्राय डेट्स या नावानंही ओळखता. तुम्ही सुके खजूर खाणं सुरु करु शकता. तुम्ही दररोज सकाळी एक ग्लास दुधासोबत 4 ते 6 सुके खजूर खाऊ शकता. त्याशिवाय तुम्ही भिजवलेले खजूरही खाऊ शकता. रात्री झोपण्यापूर्वी सुके खजूर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी पाण्या बाहेर काढून खा. असं केल्यास हिवाळा येईपर्यंत तुमचे शरीर व्हायरल आजार, सर्दी, फ्लू, ताप पसरवणाऱ्या विषाणूंशी लढण्यासाठी तयार होईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या इतर बातम्या :