Sperm Count Declines Accelerate Worldwide : जगभरातील पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या घटत असल्याची धक्कादायक बाब अभ्यासातून समोर आली आहे. 1970 च्या दशकापासून जागतिक शुक्राणूंची संख्या निम्म्याहून अधिक कमी झाली आहे, शतकाच्या उत्तरार्धापासून यात वेगाने घट होत आहे, असे एका नवीन अभ्यासात आढळून आले आहे. ह्युमन रिप्रॉडक्शन अपडेट जर्नलमध्ये याबाबत हा अभ्यास करून निष्कर्ष सांगण्यात आले आहेत. या निष्कार्षांच्या अनुसार, आठ संशोधकांच्या टीम काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली आहे. ज्यात सार्वजनिकरित्या जगत असलेलं आरोग्य हा चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान जगभरातील 223 अभ्यासांच्या विश्लेषण अनुसार 1972 ते 2018 दरम्यान एकूण शुक्राणूंची संख्या 62% कमी झाली आहे असं अभ्यासातून समोर आलं आहे. 


या अभ्यासामध्ये उत्तर अमेरिका, युरोप, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शुक्राणूंची संख्या 2011 पर्यंत कमी होत असल्याचे आढळून आली तर आशिया आणि दक्षिण अमेरिकेसह क्षेत्रामध्ये जोडून अभ्यास केला असता तेव्हापासून झीज वाढल्याचे दिसून आले. 2000 पासून गोळा केलेल्या डेटाचे विश्लेषण करताना एकूण शुक्राणूंच्या संख्येत वार्षिक घट 2.5% पर्यंत वाढली ही घट 1972 च्या तुलनेत 1.4% इतकी आहे. 2021 च्या डॅनिश अभ्यासात काही रसायने संभाव्य दोषी म्हणून सूचीबद्ध केली आहेत. तपासलेल्या सर्व मानवांच्या रक्त, मूत्र, वीर्य, नाळ आणि आईच्या दुधाच्या नमुन्यांमध्ये ही रसायने आढळून आली असल्याचं अभ्यासात आढळून आले आहे. अशा काही गोष्टींच्यामुळे चिंता वाढली आहे. शुक्राणूंची संख्या ही मानवी प्रजननक्षमतेवर परिणाम करणारी एकमेव समस्या नाही. 


दरम्यान नेचर रिव्ह्यूज युरोलॉजीमध्ये ऑगस्टमध्ये प्रकाशित झालेल्या आणखी एका अभ्यासात असा निष्कर्ष काढला गेला की स्थानिक परिणाम खूप विशिष्ट किंवा केवळ तात्पुरते असू शकतात आणि याचा अर्थ असा नाही की "जगभरात मानवी वीर्य गुणवत्ता खालावते आहे." परंतू ताज्याअनुमानाप्रमाणे, बदलत्या जीवनशैलीपासून प्रदूषणापर्यंतच्या शक्यतांसह विविध कारणं ही शुक्राणूंची घट दाखवणारी ठरली आहेत. या सततच्या घसरणीच्या कारणांवर संशोधन करणे आणि पुरुषांच्या पुनरुत्पादक आरोग्याचा पुढील व्यत्यय टाळण्यासाठी कृतींची तातडीने गरज आहे असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.


अनेक संभाव्य विषारी रसायने आपल्याला अन्नाद्वारे पोहोचतात, जी तुमच्या शुक्राणूंवर परिणाम करणारी ठरत असल्याचं  ब्रुनेल युनिव्हर्सिटी लंडनचे प्राध्यापक अँड्रियास कॉर्टेनकॅम्प यांनी अधोरेखित केले. बर्‍याच प्रमाणात बिस्फेनॉल A चे सेवन दुधाद्वारे होते, दुधाच्या डबे आणि कॅन केलेला खाद्यपदार्थ, उदाहरणार्थ टोमॅटो टिन्स, उत्पादनामध्ये बीपीए लीच करतात. ज्या काही ना काही परिणाम होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जगाची लोकसंख्या नुकतीच ८ अब्ज झाली असताना इस्रायलचा अभ्यास समोर आला आहे. तरीही, जन्मदर मोठ्या प्रमाणात घसरत आहेत - याचा अर्थ पुढील अब्ज जोडण्यासाठी मागीलपेक्षा जास्त वेळ लागेल.