Shraddha Murder Case Aftab Psychology : रोमॅंटिक, काळजी घेणारा, गोड प्रियकर,- हे असे गुण आहेत, जी प्रत्येक मुलगी आपल्या जोडीदारामध्ये पाहत असते. अशा व्यक्ती मिळण्याची शक्यता आता ऑनलाइन डेटिंगमुळे सहज शक्य आहे. पण श्रद्धा हत्याकांडकडे (Shraddha Murder Case) पाहता, प्रश्न असा निर्माण होतो की, या परीकथेाचा शेवट इतका क्रूर होईल. तुम्ही कधी कल्पना केली नसेल, पण या प्रकरणात प्रियकराने प्रेयसीची हत्या करून, तिचे तुकडे करून चक्क रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले, त्यानंतर हे तुकडे जंगलात फेकले. मानसशास्त्रज्ञ श्वेता शर्मा सांगतात की, अशा व्यक्तीच्या मनात काय चालले असेल? जो इतक्या क्रूरपणे हत्या करण्याची क्षमता ठेवतो. श्रध्दा खून प्रकरणाने अवघे जग हादरले असताना, इतका रानटीपणा लपवणाऱ्या अशा लोकांना कसे ओळखायचे? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.


दिल्लीतील मेहरौली येथील श्रद्धा हत्याकांड प्रकरणाची देशभर चर्चा होत आहे. श्रद्धाची हत्या तिचाच प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून जंगलात फेकून दिले. या घटनेनंतर आफताबने हे सर्व कसे केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करताना तो घाबरला नव्हता का? अखेर तो 20 दिवस श्रद्धाच्या शरीराच्या अवयवांसह एकाच फ्लॅटमध्ये कसा राहिला? त्यावेळी आफताबचा मूड कसा असावा? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेताना मानसशास्त्रज्ञ श्वेता शर्मा  (Clinical Psychologist Shweta sharma) यांनी खून प्रकरणाबाबत काय सांगितले?


या संपूर्ण प्रकरणावर मानसशास्त्रज्ञ श्वेता शर्मा काय म्हणाल्या?


एबीपी लाइव्ह पॉडकास्ट टीमने या संपूर्ण प्रकरणावर एका शोमध्ये मानसशास्त्रज्ञ श्वेता शर्मा यांच्याशी खास बातचीत केली. श्वेता शर्मा यांना सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला की, असे कृत्य करताना माणसाच्या आतील सहानुभूती का मरते? तो एखाद्याला इतक्या क्रूर पद्धतीने कसा मारतो? तसेच आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या अशा लोकांना कसे ओळखता येईल आणि आपण सुरक्षित कसे राहू?


लहानपणापासूनच सामान्य मुलांच्या तुलनेत वेगळा स्वभाव


डॉक्टर श्वेता सांगतात, 'आम्हाला अशा लोकांबद्दल तेव्हाच कळते, जेव्हा अशी प्रकरणे समोर येतात. पण तुमच्या माहितीसाठी तुम्हाला सांगते की, अशा लोकांचे बालपण पाहिले तर, त्यांचा स्वभाव सामान्य मुलांच्या तुलनेत सुरुवातीपासून वेगळा असतो. अशा लोकांना लहानपणापासूनच कंडक्ट डिसऑर्डर, ओडीडी असतो, ज्यामुळे पुढे जाऊन ते एंटीसोशल पर्सनालिटी डिसऑर्डरचे शिकार होतात.


एंटीसोशल पर्सनालिटी डिसऑर्डर म्हणजे काय?


अशा लोकांना आपण मनोरुग्ण म्हणतो. अशी माणसे पटकन सापडत नाहीत, पण नीट तपास केला तर त्याला आपण एंटीसोशल पर्सनालिटी डिसऑर्डर म्हणू. ते एका दिवसात कळत नाही. लहानपणापासून ते वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत ते माणसामध्ये विकसित होत असते. नंतर वाढत्या वयाबरोबर इतर प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाची त्यात भर पडते. श्वेता सांगतात, 'अशा लोकांचे बालपण खूप वाईट असते. लहानपणी त्यांनी खूप मारहाण, शिवीगाळ पाहिली असेल. त्यामुळे त्याचा स्वभाव असा झाला आहे. दुसरी गोष्ट अशी देखील होऊ शकते,  जेव्हा तुम्ही एखाद्या मुलाला नेहमी शिव्या देत असाल आणि त्याला बोलण्याची संधी देत ​​नाही. अशा स्थितीत अनेकवेळा असे घडते की, काही काळानंतर त्या मुलामधील भावना पूर्णपणे संपून जातात. जेव्हा असे मूल मोठे होते, तेव्हा इतर लोकांशी असलेली भावनिक ओढ पूर्णपणे संपते. काही काळानंतर, अशा लोकांमध्ये राग आणि आक्रमकता दिवसेंदिवस वाढू लागते. ते पुढे त्यांच्या स्वभावावर नियंत्रण ठेवू शकत नाही.


पालकांनी समतोल राखणे फार महत्वाचे


जर तुम्ही मुलाचे खूप लाड करत असाल. त्यांना योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगत नसाल, तर ते चुकीचे देखील आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलाने काही मागितले की, लगेच तुम्ही सर्व काही त्याच्याकडे आणलेच पाहिजे असे नाही. अशा स्वभावाला अजिबात प्रोत्साहन देऊ नका. तुम्हीही कधी कधी नकार द्यावा आणि सर्व गोष्टी मुलासमोर आणू नयेत. वस्तू न दिल्याने ते काय करतात? याविषयी मुलांची प्रतिक्रियाही पाहावी. 


तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जाणून घ्या


श्रद्धाचा बॉयफ्रेंड आफताबला विचारण्यात आले की, तू श्रद्धाचे 35 तुकडे कसे केलेत, ज्यावर त्याने उत्तर दिले की, त्याला सायकॉलॉजिकल थ्रिलर मालिकेतून कल्पना आली. यावर डॉ. श्वेता म्हणतात, 'आजकाल वेब सिरीज, चित्रपटांमध्ये खलनायकांना हिरो म्हणून दाखवले जाते. हे पाहून तरुण पिढीला खूप आनंद होतो. अशा परिस्थितीत समाजासाठी खरा खलनायक कोण आणि हिरो कोण, हे कळायला हवे. चित्रपट किंवा वेबसिरीजमध्ये काय चूक आणि काय बरोबर हेही दाखवायला हवे. काही लोकांना थ्रिलर पाहण्यात मजा येते. एक व्यक्ती दुसऱ्याला त्रास देत आहे, हे त्यांना आवडते. त्यामुळे अशा लोकांसाठी मी म्हणेन की, जर तुम्ही चित्रपट किंवा वेब सीरिजमध्ये एखादे भांडण पाहण्याचा आनंद घेत असाल. किंवा एखाद्याचा मृत्यू झाल्यावर रडता येत नसेल तर एखाद्या चांगल्या मानसशास्त्रज्ञाला भेटावे. कारण भावना, रडणे, हसणे हा मानवी स्वभाव आहे. 


तुमचा जोडीदार तर 'असं' करत नाही ना? वेळीच ओळखा
कोणाच्या मृत्यूवर कोणताही चित्रपट पाहणे, हसणे, रडणे किंवा काहीही होत नसेल तर ही समस्या आहे. आपल्या सभोवतालचे मनोरुग्ण कसे ओळखायचे? डॉक्टर श्वेता म्हणतात, 'जर तुम्ही एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असाल तर त्याचा स्वभाव कसा आहे हे समजून घेतले पाहिजे. जर तुमचा पार्टनर खूप कंट्रोलिंग असेल आणि तुम्हाला सतत अडवणूक करत असेल तर ही एक समस्या आहे. श्रद्धा किंवा आफताबबद्दल बोलायचे झाले तर, दोघांमधील हे पहिलेच भांडण असेल असे नाही. हाणामारी याआधीही झाली असेल, पण त्या मुलाचा स्वत:वर इतका ताबा होता की, तो मुलीला शांत करून दिल्लीला घेऊन आला होता. मुलाची आज्ञा मानून श्रद्धाही दिल्लीला आली. आणि त्यानंतर हे कृत्य घडलं. भांडणे प्रत्येकाची होतात, प्रत्येकाच्या चेहऱ्याचे हावभाव बदलतात. पण जर एखादी व्यक्ती आपल्या बोलण्यातून, किंवा वागण्यातून वारंवार तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, तर येणाऱ्या काळात तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात.


इतर महत्वाच्या बातम्या


Meera Borwankar on Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या तपासात कोणती आव्हानं?