Summer Skin Care : उन्हाळ्यात तापमान वाढले की त्याचा परिणाम त्वचेवर होतो. शरीर डिहायड्रेट (Dehydration) होते, पाण्याची कमतरता जाणवते आणि त्यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. त्याचबरोबर तीव्र सूर्यप्रकाश (Sunlight) आणि प्रदूषणामुळे (Pollution) त्वचेमध्ये घाण साचते. चेहऱ्यावर मुरुम (Pimples) आणि काही काळाने मुरुम फुटणे, अशा समस्या सुरू होतात. अशा परिस्थितीत, आपल्या त्वचेची विशेष काळजी (Skin Care) घेणे आवश्यक आहे, परंतु फक्त वरून वरुन त्वचेची काळजी घेऊन चालत नाही. आपल्याला शरीराला आतून देखील थंड ठेवण्याची आवश्यकता असते, डिटॉक्सिफाय करण्याची गरज असते. जेव्हा तुमची त्वचा आतून निरोगी राहील, तेव्हा त्वचेची काळजी घेण्याच्या परिणाम बाहेरूनही दिसून येतो. मग जाणून घेऊया त्वचेची आतून आणि बाहेरून काळजी कशी घ्यायची.


निरोगी त्वचेसाठी प्या बडीशेप सरबत


उन्हाळ्यात बडीशेपचा सरबत पिणे खूप फायदेशीर ठरते, त्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते आणि पोट देखील थंड राहते. पचनाशी संबंधित कोणतीही तक्रार उद्भवत नाही आणि शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते. बडीशपमुळे रक्त साफ होते आणि तुम्हाला पिंपल्स आणि ब्रेकआउट्सची समस्या येत नाही. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यात तुमच्या सकाळच्या रुटीनमध्ये बडीशेप सरबत देखील समाविष्ट करू शकता.


कसा बनवायचा बडीशेप सरबत?



  • एक ग्लास पाण्यात एक ते दोन चमचे बडीशेप टाका.

  • आता हे मिश्रण 5 मिनिटं उकळा.

  • त्यात चवीनुसार मध घालून थंड होण्यासाठी ठेवा.

  • आता हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा आणि थंड झाल्यावर प्या.


चेहऱ्यावर लावा दूध आणि तांदळाच्या पिठाचा पॅक



  • एक चमचा दूध घ्या

  • तांदळाचे पीठ 1 टीस्पून

  • व्हिटॅमिन ई कॅप्सूल


फेस पॅक कसा बनवायचा?



  • तांदळाचे पीठ, दूध आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल एका भांड्यात मिसळा.

  • यानंतर हलक्या हातांनी हळू हळू चेहऱ्यावर स्क्रब करा.

  • आता 20 मिनिटे हा पॅक चेहऱ्यावर राहू द्या.

  • पॅक सुकल्यावर सामान्य पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

  • यामुळे त्वचा टवटवीत होईल.


फेस पॅकचे फायदे


दूध आणि तांदळाचे पीठ लावल्याने त्वचेतील मृत पेशी निघून जाण्यास मदत होते. यामुळे नवीन पेशींची वाढ होते आणि रंग सुधारण्यास मदत होते. हा फेस मास्क त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत करतो. तांदळाच्या पिठात अँटी एजिंग ऑइल शोषणारे गुणधर्म आढळतात, जे त्वचेवर वृद्धत्वाचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात.


हेही वाचा:


Make Eyebrow thick: भुवया दाट करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय; सौंदर्यातही पडेल भर