Medicine Remove Alcohol Intoxication : भारतात दारु (Liquor) पिणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. अति प्रमाणात दारु प्यायल्याने हँगओव्हरचा त्रास व्हायला लागतो. दारु हे एक उत्तेजक पेय आहे. दारु प्यायलाने नशा चढते. दारु प्यायल्याने बरेच त्रास होतात. अनेक जण घरच्या घरीच उपाय करतात. उपाय करुनही ते कामी येत नाहीत. परिणामी दारुचा हँगओव्हर तसाच राहतो. दुसऱ्या दिवशी पोटात जळजळ होणे, पित्ताचा त्रास होणे, जेवण करु न वाटणे असे त्रास होतात. दारु प्यायल्याने आपल्या शरीरावर अत्यंत वाईट परिणाम होत असतो. काही परिणाम त्वरीत होतात तर काही परिणाम हळूहळू होत जातात. तर काही वेळा दारु ही शरीरातील अवयव कायमस्वरुपी निकामी करण्यासाठी कारणीभूत ठरते. मात्र आता असं होमिओपॅथीचे औषध मिळत आहे जे घेतल्याने तुमचा हँगओव्हर लगेच उतरु शकतो. हे औषध दारु प्यायल्यानंतर तुम्ही लगेच घेऊ शकता. याच औषधाबद्दल संजय दत्तने कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितले होते. 


कपिल शर्माच्या शोमध्ये झाला होता या औषधाचा उल्लेख


कपिल शर्माच्या शोमध्ये संजय दत्त पाहुणा म्हणून आला तेव्हा कपिल शर्माने त्याला विचारले की, अजय देवगण त्याचा फॅमिली डॉक्टर आहे का? यावर उत्तर देताना संजय दत्त म्हणाला होता की, होय, अजय देवगण त्याचा चांगला मित्र तसेच फॅमिली डॉक्टर आहे. संजय दत्त म्हणाला की, अजय देवगणला औषधांचे चांगले ज्ञान असल्यामुळे तो त्याला डॉ. अजय म्हणतो. गंमतीत संजय दत्त म्हणाला की, जेव्हा तो जरा जास्त दारु पितो तेव्हा अजय देवगणकडे होमिओपॅथी औषध आहे, ज्याचे 6 थेंब घेतल्याने सकाळपर्यंत सर्व काही ठीक होते.


कोणते आहे हे औषध? 


फेसबुकवर रोहन फोगाट नावाने एक आयडी आहे जो स्वत:ला डाॅक्टर म्हणवून घेतो. त्याने एका व्हिडीओद्वारे या औषधाचे नाव सांगितले आहे. या औषधाचे नाव NUX VOMICA 200C असे आहे. हे औषध एसबीएल कंपनी बनवते आणि या औषधाचा वापर तुम्ही कोणत्याही नशेचा हँगओव्हर उतरवण्यासाठी करु शकता. या औषधावर पांढऱ्या आणि निळ्या रंगाचे स्टिकर लावलेले असते. हे औषध तुम्ही पाण्यात मिसळून घेऊ शकता. हे औषध घेण्याआधी तुमच्या फॅमिली डाॅक्टरचा सल्ला घेऊन मगच याचा वापर करावा. 


(Disclaimer : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्याशिवाय दारुचे सेवन करणे हे आरोग्यास अपायकारक आहे. ही बातमी दारू पिण्यासाठी प्रोत्साहन नाही. कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)


इतर महत्वाच्या बातम्या


Alcohol from Trees : काय सांगता? आता लाकडापासूनही दारुची निर्मिती, नेमकी काय आहे प्रक्रिया?