Shoulder arthritis: एखादी वस्तू उचलताना खांद्यांमध्ये प्रचंड वेदना, सांध्यांची गती मंदावणे आणि दैनंदिन कामे करण्यात अडचणी येणे अशी लक्षणे दिसत असतील तर खांद्याचा संधिवात होण्याची शक्यता नाकारता येत नसलयाचं तज्ञ सांगतात. खांद्याचा संधिवात ही एक अशी स्थिती आहे जी जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करते. प्रख्यात शोल्डर तज्ञ डॉ. आदित्य साई(मुख्य सल्लागार, शोल्डर सर्जरी, स्पोर्ट्स इंज्युरीज आणि आर्थ्रोस्कोपी, पवई, डॉ. एलएच हिरानंदानी हॉस्पिटल) यांनी खांदा बदलण्याच्या शस्त्रक्रियेतील लक्षणे, उपचार पर्याय आणि नवीनतम प्रगती यावर प्रकाश टाकला. खांद्याचा संधिवात जीवनाच्या गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम करू शकतो, परंतु योग्य निदान आणि उपचाराने, रूग्णास आराम मिळतो आणि त्यांचे शरीर सक्रिय राहते. वेळेवर हस्तक्षेप करणे ही वेदनांपासून आराम मिळवून देण्यासाठी आणि गतीची श्रेणी वाढवण्यासाठी योग्य ठरते.


खांद्याचा संधिवात म्हणजे काय?


खांद्याचा संधिवात ही एक अशी स्थिती आहे जिथे खांद्याच्या सांध्याच्या हाडांना जोडणारे कार्टीलेज नष्ट होते. ज्यामुळे वेदना, साध्यांमधील ताठरती आणि गतिशीलता कमी होते. खांद्याचा सांधा हा तीन हाडांनी बनलेला असतो जामध्ये ह्युमरस (वरच्या हाताचे हाड), स्कॅपुला (खांद्याची चकती) आणि कॉलरबोन (गळ्याचे हाड) यांचा समावेश असतो. खांद्याच्या संधिवाताचा सर्वात सामान्य प्रकारांमध्ये ऑस्टियोआर्थरायटिसचा समावेश होतो, जो कूर्च्याची झीज झाल्याने होतो. संधिवात ही एक स्वयंप्रतिकार स्थिती आहे जिथे रोगप्रतिकारक शक्ती तसेच हाडांच्या अस्तरावर हल्ला करते, ज्यामुळे हाडांना सूज येते आणि त्यांचे नुकसान होते. पोस्ट-ट्रॉमॅटिक संधिवातामुळे खांद्याला दुखापत किंवा फ्रॅक्चर होते. रोटेटर कफ टियर आर्थ्रोपॅथी हा एक संधिवात आहे जो रोटेटर कफ फाटल्यानंतर विकसित होतो.


काय आहेत खांद्याच्या संधिवाताची लक्षणे?


खांद्याच्या संधिवाताची लक्षणे: खांद्याचा संधिवात ऑस्टियोआर्थरायटिस, संधिवात आणि पोस्ट-ट्रॉमॅटिक आर्थरायटिस या प्रकारात मोडतात. सामान्य लक्षणांमध्ये खांद्यामध्ये सतत वेदना होणे समाविष्ट आहे जे एखादी शारीरीक क्रिया करताना  किंवा रात्रीच्या वेळी बिघडते, सांध्यांमधील कडकपणा,  सांध्यांची गती मंदावणे आणि दैनंदिन कामे करण्यात अडचणी येणे, खांद्याला सूज येणे, संवेदना कमी होणे तसेच अशक्तपणा, ज्यामुळे एखादी वस्तू उचलण्याची क्षमता कमी होते.


उपचाराचे पर्याय कोणते?


खांद्याचा संधिवातामध्ये प्राथमिक व्यवस्थापनादरम्यान वेदना कमी करणे आणि खांद्यांचे कार्य सुधारणे या उद्देशाने शस्त्रक्रियेचा समावेश नसलेले उपचार पर्याय निवडले जातात. डॉ. आदित्य सांगतात की, खांद्याच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी, लवचिकता सुधारण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी औषधे आणि शारीरिक उपचार व फिजीओथेरेपीवर भर देतात. तसेच खांद्याच्या सांध्यावरील ताण कमी करण्यासाठी शारीरीक क्रियांमधील बदल आणि शारीरीक अभ्यासात मदत करतात. कॉर्टिकोस्टेरॉईड किंवा हायलुरोनिक ऍसिड इंजेक्शन्स सूज कमी करण्यास तसेच तात्पुरता आराम देण्यास मदत करतात.


शस्त्रक्रीयेची आवश्यकता किती? 


प्रगत सर्जिकल उपचार: गंभीर खांद्याचा संधिवात असलेल्या रूग्ण पारंपरीक उपचारांना प्रतिसाद देत नाहीत, याकरिता शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते.डॉ. आदित्य साई हे मुंबईतील अग्रगण्य शल्यचिकित्सकांपैकी एक आहेत जे शोल्डर रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये तज्ञ आहेत. सर्वात प्रभावी शस्त्रक्रिया उपायांपैकी एक म्हणजे खांद्याचे प्रत्यारोपण, ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये खांद्याचे खराब झालेले भाग कृत्रिम घटकांसह बदलले जातात. पेशंट-स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंट्स (PSI) सह शोल्डर रिप्लेसमेंटमध्ये सीटी स्कॅनचा समावेश आहे. अचूकता, कमी होणारा शस्त्रक्रियेचा वेळ, योग्य प्लेसमेंट आणि जीवनमर्यादा वाढविण्यासाठी केले जाते. यामध्ये वेदनांपासून जलद आराम मिळतो.