Sudden BLood Pressure Rise: बदलत्या जीवनशैलीमुळे सध्या अनेक आजार बळवतात. यातीलच एक गंभीर समस्या म्हणजे रक्तदाब कमी जास्त होणे. रक्तवाहिनांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब जेव्हा असामान्यपणे कमी किंवा अधिक होतो तेव्हा त्या व्यक्तीला बीपी चा त्रास आहे असं म्हणतात. जर कोणत्याही कारणाने रक्तदाब वाढला किंवा कमी झाला तर त्याचा तुमच्या हृदयावर वाईट परिणाम होतो. अनेकांना अनियमित रक्तदाब वाढणं किंवा कमी होणं अशा प्रकारचा त्रास होऊ लागतो. अचानक रक्तदाब वाढू नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेण्याची गरज असते. पण रक्तदाब कशाने वाढतो  जाणून घ्या. 


अति व्यायाम करत असाल तर काळजी घ्या 


अनेकांना वजन वाढीमुळे  बीपी चा त्रास सुरू होऊ लागतो. जर यावर इलाज म्हणून तुम्ही अति व्यायाम करत असाल तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. वारंवार किंवा अधिक व्यायाम केल्याने रक्तदाबाची पातळी अचानक वाढण्याची शक्यता असते. जर एखाद्याला उच्च रक्तदाबाचा त्रास होत असेल तर त्यांना कोणत्या व्यायाम फायदेशीर आहे किंवा कोणत्या व्यायामाचा धोका आहे हे तज्ञांच्या सल्ल्याने जाणून घेतलं पाहिजे. जर जिम मध्ये जात असाल तर ट्रेनरला विचारूनच व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात येतो. 


चहा कॉफीच अधिक प्रमाण 


आपल्या शरीराला कॅसिन ची सवय लागली तर त्या अतिशय घातक समजलं जातं. विशेषतः रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या किंवा एकूणच कॅफेन हा घटक शरीरात प्रवेश करतात रक्तदाब वाढू लागतो. ज्यांना चहा कॉफी अधिक पिण्याची सवय आहे, त्यांना ही सवय कमी करण्याची गरज असल्याचं सांगितलं जातं. 


डिहायड्रेशन मुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता 


शरीरात पाण्याचा समतोल असणं फार गरजेचा आहे. डिहायड्रेशन मुळे देखील अनेकदा रक्तदाब अचानक वाढतो किंवा कमी होतो. शरीरात पाण्याची पातळी कमी असेल तर रक्त घट्ट होऊ लागतं आणि त्याचा परिणाम रक्तदाबावर होतो. 


चिंता नैराश्य तणाव हेही रक्तदाब वाढीचे कारणे 


चिंता नैराश्य तणाव ही अनेक आजारांची मूळ आहेत. ज्यावेळी आपण प्रचंड तणावाखाली असतो तेव्हा शरीरातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेसह हार्मोन्स वरही त्याचा नकारात्मक परिणाम होत असतो. अशावेळी चिंता नैराश्य किंवा सततचे मूळ स्विंग्स यामुळे रक्तदाब वाढण्याच धोका वाढतो.


हेही वाचा:


थायरॉईडचा त्रास होण्यामागं आहेत ही 4 कारणं, हा आजार बरा होऊ शकतो का? वाचा A टू Z माहिती