Satish Kaushik Death : बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचं काही तासांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) निधन झालं आहे. या घटनेने बॉलिवूड इंडस्ट्रीपासून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. 66 वर्षांचे असणारे सतीश कौशिक हृदयविकाराचा झटका येण्याआधी पूर्णपणे ठिक होते. पण अचानक त्यांचं निधन कसं झालं याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठा धक्का बसला आहे. यासाठीच हृदयविकाराचा झटका कसा येतो? वयाच्या साठीनंतर हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं कशी ओळखायची? या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. 


हृदयविकाराचा झटका कसा येतो? 


हृदयविकाराचा जो झटका येतो त्याला 'मायोकार्डियल इन्फेक्शन' देखील म्हणतात. जेव्हा हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा योग्य प्रकारे होत नाही किंवा थांबतो तेव्हा एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रक्त प्रवाह पुन्हा सुरू करण्यासाठी त्वरित उपचार आवश्यक आहेत. मात्र, तात्काळ उपचार न मिळाल्यास हृदयाच्या स्नायूंना इजा होते आणि प्रकृती बिघडून व्यक्तीचा मृत्यूही होतो. हृदयविकाराच्या झटक्याची प्रक्रिया इतकी वेगवान असते की त्यावर त्वरित उपचार मिळणे अनेकदा अशक्य असते. यामुळेच हृदयविकाराच्या झटक्याच्या रुग्णांना मृत्यूचा धोका जास्त असतो.


वयाच्या साठीनंतर हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं कशी ओळखायची?


1. हृदयविकाराच्या बहुतेक केसेसमध्ये, छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला अस्वस्थता किंवा सौम्य वेदना जाणवतात. पण, छातीत हलकीशी अस्वस्थता किंवा जळजळ याकडे सहसा गॅस म्हणून दुर्लक्ष केलं जाते. तसेच, छातीत जडपणा किंवा वेदना जाणवत असल्यास याकडे कधीही दुर्लक्ष करू नका.


2. अशक्तपणा किंवा चक्कर येणे. थंड घाम येणे. 


3. जबडा, मान, पाठ किंवा पोटाच्या वरच्या भागात वेदना आणि अस्वस्थता जाणवणे.


4. श्वास घेण्यात अडचण होणे. छातीत अस्वस्थता होण्यापूर्वी , श्वासोच्छवासाची समस्या देखील उद्भवू शकते.


5. जास्त घाम येणे.


60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना हृदयविकाराचा झटका कसा टाळता येईल?


1. धुम्रपान सोडा.


2. रक्तदाब नेहमी 120/80 mm Hg च्या खाली ठेवा.


3. कॉलेस्ट्रोलची पातळी तपासत राहा. 


4. ट्रान्स फॅट, सोडियम आणि जास्त साखर असलेले अन्नपदार्थ टाळा.


5. शारीरिकदृष्ट्या अॅक्टिव्ह व्हा. 


6. चांगली झोप घ्या. दिवसातून 7 ते 9 तासांची झोप घ्या.


7. नियमित डॉक्टरांचा फॉलोअप घ्या.


8. तुमची औषधे वेळेवर घ्या. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 


Health Tips : शरीरातील 'या' सामान्य समस्यांचा थेट हृदयावर परिणाम होतो; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका