Smoking : सिगारेट (Cigarette) ओढणं हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे, त्यामुळे कॅन्सर होऊन जीवही जाऊ शकतो. तशा प्रकारच्या सूचनाही सिगारेटच्या पाकिटावर लिहिलेल्या असतात. पण त्या वाचूनही अनेकजण सिगारेट ओढतात. कॅन्सरची सूचना देऊनही सिगारेट ओढणारे लोक ती सोडत नाहीत. आता असे का होते असा प्रश्न पडतो. लोक इतक्या सहजतेने सिगारेट का सोडू शकत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर आज जाणून घेऊया. 


आजकालच्या तरुणाईमध्ये सिगारेट ओढणं हे कॉमन होत आहे, यामध्ये तरूणींचीही संख्या मोठी आहे. तरुणाईमध्ये चेन स्मोकिंगचं व्यसनंही वाढताना दिसत आहे. अनेकजणांना यातून बाहेर पडायचं असतं. काही काळासाठी ते भावनांवर नियंत्रण ठेऊन सिगारेट सोडतातही. पण सिगारेट प्यायची इच्छा तीव्र झाली की पुन्हा ते व्यसनाच्या आहारी जातात. मग यातून कॅन्सर असो वा इतर आजारांचा धोका बळावतो. 


तुम्ही सिगारेट ओढता तेव्हा काय होते?


बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत आरोग्य मानसशास्त्रज्ञ प्रोफेसर रॉबर्ट वेस्ट यांनी स्पष्ट केले की, सिगारेटमध्ये असलेल्या निकोटीनचे व्यसन हे हेरॉइन आणि कोकेनच्या व्यसनासारखे आहे. याचा अर्थ असा की एकदा का तुम्हाला याची लागण झाली की तुम्हाला ते इतक्या सहजासहजी सोडणे शक्य होणार नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जेव्हा धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्यांना निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी घ्यावी लागली होती. यावरून सिगारेटचे व्यसन किती तीव्र असू शकते याचा अंदाज येतो. 


धूम्रपान सोडणे इतके अवघड का आहे?


तुम्ही दोन-चार वर्षांपासून सिगारेट ओढत असाल आणि आता ती सोडायची असेल, तर ते इतके सोपे नाही. तथापि जर मेंदूच्या अॅनिमल पार्टवर नियंत्रण ठेवले तर आपण धूम्रपान सोडू शकता. वास्तविक अॅनिमल पार्ट हा मेंदूचा असा भाग आहे जो तुम्हाला सिगारेट ओढण्यास प्रवृत्त करतो. जेव्हा तुम्ही चेन स्मोकर असाल आणि सिगारेट सोडण्याचा प्रयत्न करत असाल तेव्हा निकोटीन वेळोवेळी तुमच्या मेंदूच्या अॅनिमल पार्टला उत्तेजित करते. त्यामुळे तुमची सिगारेट ओढण्याची इच्छा तीव्र होते.


सिगारेट ओढण्यामुळे आपल्य शरीरावर परिणाम तर होतोच, पण जीवही जाऊ शकतो. सिगारेट ओढण्याची ही इच्छाच या सर्वाच्या मुळाशी आहे. त्यामुळे  सिगारेट ओढण्याच्या या इच्छेवर नियंत्रण ठेवणारेच धूम्रपान सोडू शकतात. 


ही बातमी वाचा: