Reasons For Suicide : आज अभिनेत्री, मॉडेल आकांशा मोहन (Akanksha Mohan) हिने आत्महत्या केली आहे. या घटनेने पुन्हा एकदा आत्महत्येसंदर्भात प्रश्न उपस्थित झाला आहे. कोरोना काळात तर आत्महत्येचं प्रमाण फारच वाढलं होतं. मात्र, एखादा सेलिब्रिटी असो किंवा सामान्य व्यक्ती आत्महत्या नेमकी का करतात? याचं कारण अद्याप स्पष्टच झालं नाही. 


नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी आत्महत्येच्या (Suicides) घटना वाढत आहेत. 2021 मध्ये भारतात (India) तब्बल 1,64,033 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. 2020 मध्ये ही संख्या 1,53,052 होती. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये आत्महत्यांच्या घटनांमध्ये 7.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर या वर्षी आत्महत्यांचे प्रमाण 6.2 टक्क्यांनी वाढले आहे. विशेष म्हणजे देशात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक जास्त म्हणजे 22,207 आत्महत्या झाल्या आहेत. एनसीआरबीरने (National Crime Records Bureau) नुकताच त्यांचा अहवाल जाहीर केला आहे.


आत्महत्या करण्यामागची नेमकी कारणं कोणती?



  • कौटुंबिक समस्या 

  • आजार 

  • व्यसनाधीनता 

  • वैवाहिक समस्या 

  • प्रेमसंबंध 

  • कर्जबाजारीपणा

  • बेरोजगारी 

  • मालमत्ता प्रकरण 

  • संशयास्पद नातेसंबंध 

  • करिअर समस्या 

  • इतर कारणे


वरील कारणांपैकी काही सामान्य आत्महत्येची कारणं आहेत. मात्र, एखादा सेलिब्रिटी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा त्या आत्महत्येमागची कारणं काही अंशी वेगळी असतात. उदा..नैराश्य, अपयश इ.. कलाकाराच्या कलेला वाव मिळण्यापेक्षा त्यामध्ये व्यावसायिकता वाढलेली आहे. आणि यामध्येच स्पर्धा, फेव्हरिझम, नेपोटिझम या सगळ्यांमधून नैराश्य येतं.


सेलिब्रिटींच्या आत्महत्येमागची कारणं कोणती? 



  • नैराश्य

  • सतत येणारं अपयश

  • स्पर्धात्मक युग 

  • समाजात बदनाम होण्याची भिती

  • इतर कारणं


या संदर्भात सारथी काऊन्सिंगच्या संचालिका आणि मानसोपचारतज्ज्ञ मानसी आमडेकर (Manasi Aamdekar) म्हणतात, मुळात अभिनय असो किंवा मॉडेलिंग या क्षेत्राची बेसलाईन आहे ती म्हणजे "Some or the other time You are going to be replaced'. हे जितक्या लवकर समजून घेता येईल तितकं चांगलं. हे जर तुम्हाला कळलं तर कदाचित आत्महत्येचं प्रमाण कमी होऊ शकतं."


आत्महत्या रोखण्यामागचे उपाय :



  • यश हे तात्कालिक असतं हे समजून घेणं.

  • क्षेत्र कोणतंही असो चढ-उतार असणारच!

  • स्पर्धा खिलाडूपणे करावी!

  • क्षमतांचा शोध कायम ठेवावा.

  • टोकाचे विचार मनात आल्यास आधी जवळच्या व्यक्तींशी शेअर करावे. वेळेत सल्लाही जरूर घ्यावा.

  • जीवाची किंमत सर्वात जास्त असते.


गेल्या काही महिन्यांत आकांक्षापूर्वी पूजा सरकार, बिदिशा डे मजुमदार, पल्लवी डे, मंजुषा नियोगी आणि सरस्वती दास यांच्या आत्महत्येने इंडस्ट्री हादरली होती.


महत्वाच्या बातम्या : 


Akanksha Mohan: मॉडेल, अभिनेत्री, डान्सर अन् इंजिनिअर, तरीही संपवावं वाटलं आयुष्य! जाणून घ्या कोण होती आकांशा मोहन