Onion Benefits: कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर कांदा (Onion) सर्व्ह केला जातो. तसेच जेवण कराताना कांदा कापून खायला अनेकांना आवडतं. उन्हाळ्यात (Summer) कच्च्या कांद्याचे सेवन करावे.  कांदा खाल्ल्याने अनेक फायदे होतात.  कांद्यामध्ये अँटी ऍलर्जी, अँटिऑक्सिडंट्स, कार्सिनोजेनिक हे गुणधर्म आहेत. याशिवाय कांद्यामध्ये व्हिटॅमिन ए देखील जास्त प्रमाणात असते. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी देखील कांद्यामध्ये आढळतात. कांद्याचे सेवन केल्यानं होणाऱ्या फायद्यांबद्दल जाणून घेऊयात...



उष्माघातापासून संरक्षण (Heat Stroke)
उन्हाळ्यात वाढत्या तापमानात उष्माघाताचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे उन्हाळ्यात कांद्याचे सेवन केल्यास उष्माघाताचा धोका कमी होतो. कांद्यामुळे शरीर हायड्रेट राहते. यामुळे उन्हाळ्यात लोक कांदा खातात.


रोगप्रतिकारक शक्ती (Immunity)
कांदा खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यानं संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते. कांद्यामध्ये रोगप्रतिकारक पेशी टिकवून ठेवण्याचा गुणधर्म असतो. जर तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल, तर कांदा रात्री  जेवण करताना किंवा दुपारी जेवताना खाऊ शकता. 


पचन क्रिया  (Digestion Process)
कांदा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. कांद्यामध्ये फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅस  यांसारख्या समस्या दूर होतात. कांदा खाल्यानं आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. ज्यामुळे पचन क्रिया सुधारते.


भाजीमध्ये किंवा सॅलडमध्ये कांदा जास्त प्रमाणात टाकावा. तसेच काच्चा कांदा देखील तुम्ही उन्हाळ्यात खाऊ शकता.


कांदा खाल्यानं ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो. यामध्ये असलेले क्वेर्सेटिन इतके प्रभावी आहे की ते ल्यूकोट्रिएन्स, प्रोस्टाग्लॅंडिन आणि हिस्टामाइनचे प्रभाव कमी करू शकते. कांद्याचे सेवन केल्यानं सांधेदुखी देखील कमी होते.


उन्हाळ्यात अशी घ्या काळजी  


उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्यावी तसेच उन्हाळ्यात भरपूर पाणी देखील प्यावे.  उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. त्याच प्रमाणे उन्हाळ्यात दोन वेळा अंघोळ करा. ज्यामुळे घामामुळे शरीरावर चिकटलेली धूळ निघून जाते. योग्य काळजी न घेतल्यास उन्हाळ्यात तुमची त्वचा निर्जीव, तेलकट आणि निस्तेज बनते. कडक उन्हामुळे सनबर्न, रॅशेस, पिंपल्स, टॅनिंग, मेलास्मा आणि सन अॅलर्जी अशा अनेक समस्या उद्भवतात. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या इतर बातम्या :


Sun Poisoning : कडक उन्हामुळे सन पॉयझनिंगचा धोका, जाणून घ्या लक्षणे आणि उपाय