Brain Fog Causes Symptoms And Precautions : ओमायक्रॉन व्हेरियंटमध्ये तीव्र लक्षणं नसल्यानं बेफिकीरीनं वागणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ओमायक्रॉनवर मात केलेल्या रुग्णांमध्ये 'ब्रेन फॉग'चा धोका संभावण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांमध्ये ब्रेन फॉग हे लक्षण दिसलं होतं. मात्र आता ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्यांमध्ये ब्रेन फॉग दिसून आलं आहे.
ब्रेन फॉगशिवाय अन्य काही गंभीर लक्षणंही ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्यांच्यात दिसून आली आहेत. ओमायक्रॉन संसर्गानंतर रक्तात प्रथिनांच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आलेय त्यामुळे हृदयावर ताण येऊन हृदयाची रक्ताभिसरण क्षमता घटत असल्याचं दिसून आलंय. तसंच फुफ्फुसं आणि किडन्यांची कार्यक्षमता 2-3 टक्क्यांनी घटण्याची तज्ज्ञांना भीती आहे. त्यामुळे ओमायक्रॉनला गृहीत धरू नका, या संसर्गानंतर रुग्णालायात दाखल होण्याचं प्रमाण किंवा तीव्र लक्षणं दिसत नसली तरी बरं झाल्यानंतर पोस्ट रिकव्हरी सिम्पटम्स गंभीर असण्याची शक्यता आहे.
'द डेली एक्सप्रे'च्या वृत्तानुसार, कोविड-19 मध्ये दिसणारे दुर्मिळ लक्षण ब्रेन फॉग ओमायक्रॉन व्हेरिएंटमध्येही पाहायला मिळत आहे. कोरोनामुक्त झालेल्या अनेक रुग्णांनी ब्रेन फॉग या समस्येचा सामना करत असल्याचं सांगितलं आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये पहिल्यांदा ब्रेन फॉग या लक्षणाबाबत तज्ज्ञांना माहिती मिळाली होती.
कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर ब्रेन फॉग हे लक्षण दिसलं होतं. परंतु सर्वच रुग्णांमध्ये हे लक्षण न दिसल्यानं ताप, थंडी, श्वास घेण्यास त्रास, खोकला किंवा शरिरात दिसणाऱ्या अन्य लक्षणांमध्ये याचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र आता ओमायक्रॉन बाधितांमध्येही हे लक्षण दिसू लागलं आहे.
देशात तिसरी लाट धडकली?
देशासह राज्यातही ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव दिसून येत आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध वाढवण्यात आले आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा सुमारे दोन लाखांच्या जवळ पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासात 1 लाख 94 हजार 720 नवे कोरोनारुग्ण आढळले असून 442 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 9 लाख 55 हजार 319 सक्रीय रुग्ण आहेत. सध्याचा कोरोना रुग्ण वाढीचा दर 11.05 टक्के इतका आहे. शिवाय, देशातील ओमायक्रॉन व्हेरियंट (Omicron) चा संसर्गही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. भारतातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या 4 हजार 868 वर पोहोचली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- कोरोनाच्या उपचारात 'मोलनुपिरावीर' औषधाचा समावेश नाही : ICMR
- Omicron Symptoms: लहान मुलं आणि तरूणांमध्ये ओमिक्रॉनची लक्षणं वेगळी, कसं ओळखायचं? घ्या जाणून
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह