Fatty Liver Disease : फॅटी लिव्हर हा आजार आजकाल सर्रास आढळतो. रुटीन सोनोग्राफी तपासण्यांमध्ये  सरासरी 30 ते 50 % या प्रमाणात याचा प्रभाव दिसतो. सर्वसाधारणपणे याची लक्षणे फार प्रभावी नसल्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करतो. परंतु दुर्लक्ष केल्यामुळे भविष्यात, हे लिव्हर सिरॉसिस मध्ये परावर्तित होऊ शकते आणि काही रुग्णांमध्ये लिव्हर कॅन्सरही होऊ शकतो. म्हणून वेळीच काळजी घेणे आणि इलाज करणे गरजेचे आहे. पुण्यातील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये  मेडिकल गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी म्हणून कार्यकरत असणारे डॉ. अमोल डहाळे यांनी नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर बद्दल सविस्तर माहिती दिली. 


कोणत्या कारणामुळे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर होऊ शकते?


फॅटी लिव्हरच्या सर्वाधिक रुग्णांमध्ये लठ्ठपणा/ चरबीचे अधिक प्रमाण हे महत्वाचे आणि मुख्य कारण असते या व्यतिरिक्त विविध प्रकारची ऍलोपॅथिक औषधे, मधुमेह, थायरॉईड प्रॉब्लेम हे ही फॅटी लिव्हरची अनेक कारणे आहेत. सर्वसाधारण चरबी वाढल्यामुळे रक्तात चरबीचे प्रमाण वाढते. ही चरबी लिव्हर मध्ये प्रोसेस केली जाते आणि साठवून ठेवली जाते. लिव्हर सोबतच आतड्यांच्या आसपास आणि स्नायुंमध्येही थोड्याफार प्रमाणात फ्री फॅटी ऍसिड, सायटोकाईनस तयार होतात आणि इन्शुलिनच्या कामात अडथळा आणतात, यामुळे इन्शुलिन साखरेला रक्तातून कमी करण्यात असमर्थ होते. यालाच 'इन्सुलिन' रेसिस्टन्ट' असे म्हणतात. ही मधुमेह होण्याची पहिली पायरी असे म्हणतात. ही मधुमेह होण्याची पहिली पायरी आहे असं म्हणायला हरकत नाही. हळूहळू यामुळे लिव्हरवरील चरबीचा मारा आणि साथ जातो आणि एका विशिष्ट मर्यादेपलीकडे तो लिव्हरला इजा करण्यास सुरु करते. यालाच स्टिएटो हेपेटायटिस असे म्हणतात.


नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची लक्षणे कोणती?


नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरची विशेष लक्षणे दिसून येत नाहीत. पण काही प्रकरणांमध्ये रुग्णाला थकवा, शरीरात वेदना आणि लिव्हरला सूज येऊ शकते. काही प्रकरणांमध्ये तर फॅटी लिव्हरमुळे सिरिसिसची समस्या देखील होऊ शकत.


नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर पासून कशाप्रकारे बचाव करता येईल?  


हेच पुढे हेपेटायटिस नंतर सिरॉसिस मध्ये परावर्तित होऊ शकते. यामुळे वेळीच निदान आणि औषधोपचार आवश्यक आहे. सकस आहार, लो कॅलरी फुड, तळलेले (फ्राईड फूड), मिठाई यांसारखे अतिगोड आहारातून टाळणे, दैनंदिन व्यायाम ही काही पथ्य आपल्याला फॅटी लिव्हर होण्यापासून वाचण्यास मदत करू शकतात. लवकर निदान आणि औषोधोपचार करून सुरुवातीच्या टप्प्यात फॅटी लिव्हरला आटोक्यात आणू शकते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.