Nutmeg Health Benefits : जायफळ (Jaiphal) एक लोकप्रिय मसाला आहे. भारतासह जगभरात याचा वापर केला जातो. याच्या वापरामुळे पदार्थांची चव वाढवण्यास मदत होते. पण या व्यतिरिस्कही या मसाल्यामध्ये अनेक फायदे आहे. जायफळ औषधे आणि प्राचीन औषधींपैकी एक आहे. जायफळचा वापर आयुर्वेदामध्ये शतकानुशतके करण्यात येत आहे. जायफळाचा एक छोटासा तुकडा तुमच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. स्त्रियांनी आहारात याचा वापर केल्यास अनेक लाभ मिळतील. जायफळाचे फायदे जाणून घ्या.


गुणकारी जायफळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या.



  • जायफळ भरपूर खनिजे आणि फायबरयुक्त आहे.

  • जायफळ हे मँगनीज, तांबे, मॅग्नेशियम आणि फायबरसह विविध आवश्यक पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अनेक ब जीवनसत्त्वे यांसारख्या जीवनसत्त्वे देखील कमी प्रमाणात असतात.

  • जायफळाचा वापर भारतीय खाद्यपदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो. पण चव वाढवण्यातसोबतच हे आरोग्यासाठी फायदेशीर देखील आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जायफळाचे अनेक गुणधर्म असून ते आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतात. 

  • फक्त एक चिमूटभर जायफळ वजन कमी करण्यासाठी मदत करु शकते.

  • जायफळमुळे निद्रानाश, अपचन यांसारख्या अनेक समस्या दूर होऊन संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते.

  • जायफळाचे सेवन केल्यास त्वचेसंबंधित समस्याही दूर होतात. 

  • स्रित्रांनी गरोदरपणात जायफळाचे सेवन नक्की करावं. गरोदरपणात दररोज रात्री नियमितपणे एक चिमूटभर जायफळ मिसळून दूध प्यायल्यास आरोग्य सुधारते.

  • यामुळे शरीरातील हार्मोनल संतुलन देखील वाढवते, ज्यामुळे शरीराच्या अनेक समस्या दूर होतात.

  • जायफळाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते.

  • फक्त एक चिमूटभर जायफळ वजन कमी करणे, त्वचा, निद्रानाश, अपचन यांसारख्या अनेक समस्या सोडवू शकते आणि एकंदर आरोग्य सुधारू शकते.


जायफळाचं सेवन कसं करावं?



  • वजन कमी करण्यासाठी तुम्ही एक चिमूटभर किंवा अर्धा चमचा जायफळ पावडरचं सेवन करु शकता.

  • जायफळ पावडर दुधात मिसळून खाणं फायदेशीर ठरेल.

  • तुम्हाला निद्रानाशाची समस्या असेल तर, चांगल्या झोपेसाठी तुम्ही जायफळ पावडर दुधात मिसळून खाऊ शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Skin Care Tips : प्रदूषणामुळे त्वचेच्या समस्यांनी त्रस्त आहात? स्वत:चा बचाव कसा कराल, हे जाणून घ्या