National Cancer Awareness Day 2023 : स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) हा जगभरातील महिलांमध्ये सर्वात जास्त आढळणारा आजार आहे. स्तनाचा कर्करोग पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही होऊ शकतो, परंतु स्त्रियांमध्ये तो जास्त प्रमाणात आढळतो. स्तनाचा कर्करोग होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी शिबीरं घेतली जातात. तसेच, हा आजार नेमका कशामुळे होतो आणि झाल्यावर यावर प्रतिबंधात्मक उपाय काय? या संदर्भात जनजागृती केली जाते. याच संदर्भात कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं कोणती? याविषयी अधिक माहिती सविस्तरपणे समजून घेऊयात. 


स्तनाचा कर्करोग अनेकदा दूध उत्पादक नलिकांमधील पेशींमध्ये सुरू होतो (इनवेसिव डक्टल कार्सिनोमा) स्तनाचा कर्करोग लोब्यूल्स (इनवेसिव लोब्युलर कार्सिनोमा) नावाच्या ग्रंथीच्या ऊतींमध्ये किंवा स्तनाच्या आतल्या इतर पेशी किंवा ऊतींमध्ये देखील सुरू होऊ शकतो.


स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे 


डॉक्टर प्रशांत स्पष्ट करतात की स्तनाचा कर्करोग कोणत्याही वयाच्या स्त्रीला किंवा मुलीला होऊ शकतो. पण तुम्ही आत्मपरीक्षण करत राहिल्यास हा आजार वेळीच ओळखता येतो. विशेषत: मासिक पाळीनंतर महिलांनी महिन्यातून एकदा स्तनांची आत्मपरीक्षण करावी. जर तुम्हाला स्तनामध्ये कुठेही कठीण गुठळ्या दिसल्या, तर वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क साधा. स्तनाच्या कर्करोगाबाबत महिलांच्या मनात अनेक प्रश्न असतात. भारतातील सुमारे 5 ते 10 टक्के महिला स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. 


आजकाल लोकांना कॅन्सर या आजाराबाबत अधिकाधिक जागरूक केले जात आहे. अशा परिस्थितीत, आपण रोगाची भीती बाळगणे आवश्यक आहे परंतु उपचारांची नाही.  


स्तनाच्या कर्करोगाचे प्रकार


इनवेसिव डक्टल कार्सिनोमा : यामध्ये कर्करोगाच्या पेशी स्तनाच्या ऊतींच्या बाहेरही पसरू शकतात. तसेच, शरीराच्या इतर भागांमध्ये देखील पसरू शकते. 


इनवेसिव लोब्युलर कार्सिनोमा : कर्करोगाच्या पेशी लोब्यूल्सपासून जवळच्या स्तनाच्या ऊतींमध्ये पसरतात. हा आजार शरीराच्या इतर अवयवांमध्येही पसरू शकतो. 


स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची अनेक कारणे असू शकतात :



  • अनुवांशिक- कौटुंबिक इतिहास

  • मासिक पाळीत बदल

  • महिलांचे अचानक स्तन मोठे दिसणे

  • धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्या महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त


स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे :


सुरुवातीला स्तनाच्या कर्करोगाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. तसेच, स्तनामध्ये गाठ तयार होणे हे या आजाराचं सर्वात सामान्य लक्षण आहे. याशिवाय या लक्षणांकडेही लक्ष द्या.



  • स्तनामध्ये गाठ जाणवणे. 

  • स्तनाच्या आकारात बदल

  • स्तनाग्रातून द्रव स्त्राव होणे

  • काखेखालील भागात सूज येणे

  • स्तनाग्र लाल होणे किंवा काळे होणे


महत्त्वाच्या बातम्या : 


Air Pollution : प्रदुषणामुळे फु्फ्फुसांवर होतोय परिणाम; फुफ्फुसं जपायचे असतील तर आजच 'या' पदार्थांचा आहारात समावेश करा