Air Pollution : दिल्लीतील सतत वाढत असलेल्या वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) नागरिकांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह एनसीआरमधील हवेची गुणवत्ता सातत्याने खराब होत आहे. लोकांना प्रदूषित हवेत श्वास घेणंही कठीण झालं आहे. यामुळे लोक अनेक समस्यांना बळी पडत आहेत. गॅस चेंबर बनलेल्या शहरात नागरिकांना डोळ्यांत जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होतोय. अशा वेळी, बिघडलेल्या वातावरणात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी काही आवश्यक पावले उचलणं गरजेचं आहे. 


पर्यावरण विभागाने अलीकडेच काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यात त्यांनी नागरिकांना हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी काही मार्ग आणि निरोगी राहण्यासाठी काही खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) नुसार हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विभागाने काही टिप्स दिल्या आहेत. 


AQI- 201 ते 300 (वाईट)



  • तुमच्या वाहनांचे इंजिन जसे की कार/बाईक/स्कूटर इ. व्यवस्थित ठेवा.

  • तुमच्या वाहनाच्या टायरमध्ये हवेचा दाब योग्य ठेवा.

  • तुमच्या वाहनांचे PUC प्रमाणपत्र अपडेट ठेवा.

  • लाल दिव्यावर इंजिन बंद करा.

  • उघड्यावर कचरा टाकू नका.

  • ग्रीन दिल्ली अॅप, 311 अॅप, समीर अॅपद्वारे प्रदूषणा संबंधित रिपोर्ट द्या. 

  • वाहनांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी हायब्रीड वाहनांना किंवा ईव्हीला प्राधान्य द्या. जास्तीत जास्त झाडे लावा.

  • सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करा. फटाके फोडू नका.

  • 10/15 वर्षांपेक्षा जुने डिझेल/पेट्रोल वाहने वापरू नका.


AQI- 301 ते 400 (खूप वाईट)



  • खाजगी वाहनांचा वापर कमीत कमी करा आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.

  • नियोजित अंतराने आपली हवा नियमितपणे बदला.

  • कमी गर्दीच्या ठिकाणी जा. 

  • घनकचरा आणि बायोमास उघड्यावर जाळणे टाळा.


AQI- 401 ते 450 (गंभीर)



  • बाहेर पडताना इतर वाहनांऐवजी सायकलचा वापर करा.  

  • कामावर जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक वापरा.

  • जर तुम्ही घरून काम करू शकत असाल, तर वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडा.

  • उघड्यावर आग लागण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक हिटर देऊ शकता.


AQI- 450 च्या वर (खूप तीव्र)


मुलं, वृद्ध आणि श्वसन, हृदयविकार, सेरेब्रोव्हस्कुलर किंवा इतर दिर्घकालीन आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : श्वास घेण्यास त्रास होतोय? प्रदूषणामुळे होणारे श्वसनाचे आजार टाळायचे असतील तर 'या' टिप्स फॉलो करा