Monkeypox: मंकीपॉक्स या विषाणूला जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर जगभरात मंकीपॉक्स रोगाची प्रकरणे नोंदवली गेली. 2024 च्या सुरुवातीपासूनच या विषाणूने आपला प्राणघातक रंग दाखवायला सुरुवात केली असून अंदाजे 575 जणांचा मृत्यू या रोगामुळे आतापर्यंत झालाय. अलिकडेच युरोप आणि आशियामध्ये नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून या विषाणूवर अजूनतरी कोणताही उपचार सापडला नाही.  डॉक्टर मंकीपॉक्सच्या रुग्णांना कसं हाताळतायत? काय उपचार या व्यक्तींवर केला जातोय?


मंकीपॉक्स विषाणूवर अजून कोणताही उपचार सापडलेला नाही. कोणतीही लस यासाठी अजूनतरी आलेली नाही. अंगावर फोड येण्यासह डोकेदुखी, स्नायू दुखणे, थकवा येणे अशी लक्षणं असणारा हा रोग संक्रमित व्यक्तीशी संपर्क झाल्याने, त्वचेचा संपर्क, किंवा संक्रमित व्यक्तीशी लैंगिक संबंधासह त्याच्या कपड्यांनाही स्पर्श झाला तरी पसरतो. यावर काय इलाज केला जातोय?


मंकीपॉक्स रुग्णांना कसं हाताळलं जातंय?


मंकीपॉक्स रुग्णांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांचं विलगीकरण केलं जातंय. तसेच या रुग्णांची RTPCR चाचणी करण्याचा सल्ला देण्यात येतोय. सध्या कोणत्या व्यक्तीला या विषाणूचा संसर्ग झाला आहे, हे ओळखण्याचे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान असून जलद आणि अचूक RTPCR चाचणी करून मंकीपॉक्सच्या रुग्णांना ओळखण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.


रुग्णाची ओळख पटली की असे केले जातात उपचार


मंकीपॉक्स विषाणूवर अनेक अँन्टीव्हायरल औषधे आहेत जी कांजण्या आल्यानंतर वापरली जातात.या औषधांमध्ये टेकोविरिमेट किंवा एसटी २४६, ब्रिन्सिडोफोव्हीर आणि सिडोफोव्हीर यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त VIGIV ज्याला स्मॉलपॉक्सचा उपचार करण्यासाठी परवानगी आहे त्याला mpox आणि इतर पॉक्स विषाणूंवर उपचार करण्यासाठी अधिकृत करण्यात येऊ शकते. 


NIAID ने केल्या पॉक्स विषाणूच्या उपचारासाठी २ चाचण्या


NIAID ने पॉक्स विषाणूच्या उपचारासाठी टेकोव्हिरिमॅट औषधाच्या २ क्लिनिकल चाचण्या केल्या आहेत. या चाचण्यांमध्ये 500 हून अधिक प्रौढ आणि Mpox विषाणूची लागण झालेल्या मुलांचा समावेश करण्यात आला होता. या चाचणीत सहभागी असलेल्या सर्व संक्रमित लोकांना टेकोव्हिरिमेटचे लसीकरण करण्यात आले होते. आता यात ही लस घेतलेले किती जण बरे झाले याची चाचपणी संशोधक करतायत.


विलगीकरणावर भर


भारतात आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तसेच रेल्वेस्थानकांवर संशयित मंकीपॉक्स रुग्णाचं विलगीकरण करण्यावर सरकारचा अधिक भर असून मंकीपॉक्ससाठी आरटीपीसीआर चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो. या मंकीपॉक्स आरटी-पीसीआर चाचणी ही एक अत्यंत विशिष्ट आण्विक निदान चाचणी आहे जी एखाद्या व्यक्तीच्या शरीरात मंकीपॉक्स विषाणूची उपस्थिती शोधण्यासाठी डिझाइन केलेली आहे. ही चाचणी व्हायरल जीनोमच्या विशिष्ट क्षेत्रांना लक्ष्य करून कार्य करते, व्हायरसच्या विविध प्रकारांमध्ये अचूक ओळख सुनिश्चित करते. Siemens Healthineers या हेल्थकेअर कंपनीने "IMDX मंकीपॉक्स डिटेक्शन RT-PCR Assay" ही चाचणी विकसित केली आहे, ज्याला भारताच्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) कडून उत्पादन मंजुरी मिळाली आहे.