Mental Health : बदलती जीवनशैली..कामाचा ताण...खाण्याच्या अयोग्य वेळा, वैयक्तिक आयुष्यासाठी वेळ न मिळणे या सर्व गोष्टींमुळं बहुतांश कर्मचारी तसेच नोकरदार, व्यावसायिक आजकाल अडचणीत आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मायक्रोसॉफ्टचा एक इंजिनिअर ऑटो चालवताना दिसत होता, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो आर्थिक अडचणींमुळे हे काम करत नव्हता, यामागचं कारण होतं एकटेपणा... एकटेपणाचा सामना करण्यासाठी तो मोकळ्या वेळेत ऑटो चालवत होता. ही समस्या सध्याच्या व्यावसायिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. कशी मात कराल या समस्येवर? जाणून घ्या..
वैयक्तिक जीवनात लोक एकाकीपणाचे बळी ठरतायत
कधी कधी असं होतं की, जेव्हा दोन मित्रांचा भेटायचा प्लॅन बनतो, मात्र त्यापैकी एक किंवा दोन्ही मित्रांकडून प्लॅन रद्द होते, त्यांच्या अनुपस्थितीची ही कारणे सबब नाहीत, तर सत्य आहेत. वैयक्तिक आयुष्यासाठी वेळ मिळत नसल्याने बहुतांश नोकरदार व्यावसायिक आजकाल अडचणीत आहेत. अशा कामाच्या पद्धतीमुळे त्यांना व्यावसायिक जीवनात प्रगती तर होते, परंतु वैयक्तिक जीवनात असे लोक एकाकीपणाचे बळी ठरत आहेत.
काम करण्याची पद्धत लोकांना एकाकी बनवतेय.
ऑफिसमधील कामाची अपूर्ण उद्दिष्टं आणि अकाली बदल यामुळे व्यावसायिकांचे तसेच कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक जीवन धुळीस मिळत आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी एखाद्याला शिफ्टच्या आधी अनेक तास ऑफिसमध्ये राहावे लागते, आणि नाईट शिफ्ट असेल तर दिवसाचा वेळ झोपण्यातच जातो. ना कोणाला वेळेवर खाणे-पिणे शक्य नाही, ना कोणतेच कार्य आणि ना सामाजिक जीवन.. त्यामुळे लोकांमध्ये एकटेपणा वाढत आहे.
....तेव्हा तुमची चिडचिडही वाढू लागते.
दिवसा काही वेळ एकांत आवश्यक असतो, ज्याला Mee Time असेही म्हणतात. जे शरीर आणि मन रिचार्ज करण्याचे काम करते, परंतु सततचा एकटेपणा माणसाला तणाव आणि नैराश्याकडे ढकलतो. वैयक्तिक आयुष्य जवळजवळ संपुष्टात येते, हळूहळू व्यावसायिक जीवनावरही त्याचा परिणाम होऊ लागतो. तुम्हाला कामाचा कंटाळा येऊ लागतो आणि 100% देऊनही प्रमोशन मिळत नाही, तेव्हा तुमची चिडचिडही वाढू लागते.
या समस्येवर मात कशी कराल?
- जमेल तेवढे काम करा.
- ऑफिसमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक कामाला हो म्हणू नका.
- शिफ्ट पूर्ण केल्यानंतर स्वतःला वेळ द्या.
- तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टींसाठी वेळ काढा.
- जर तुम्ही मित्रांना भेटू शकत नसाल तर त्यांच्याशी फोन किंवा व्हिडिओ कॉलवर बोला.
- वीकेंडचे दिवस घरी झोपण्यात किंवा टीव्ही पाहण्यात घालवण्याऐवजी, लोकांना भेटा, त्यांच्याशी बोला.
- या सर्व कार्यामुळे एकटेपणाला सामोरे जाणे सोपे होते.
हेही वाचा>>>
Mental Health : आयुष्य निरर्थक वाटू लागलंय? उदासीनपणा वाटतोय? 'या' टिप्स फॉलो करा, All Is Well!
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )