Women Health: एखाद्या दिवशी कमी झोप झाली की पुढच्या दोन दिवसांचा थकवा ठरलेला. पूर्ण दिवस काम करू नये रात्री झोप न येण्याची समस्या अनेक महिलांमध्ये दिसते.  बदलत्या जीवनशैलीमुळे अपुऱ्या झोपेमुळे शरीराच्या कुरबुरी वाढत आहेत.  नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात अपुऱ्या झोपेमुळे महिलांना उच्च रक्तदाबाचा धोका अधिक असल्याचे समोर आलं आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या वार्षिक वैज्ञानिक सत्रात सादर करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार, रात्री सात तासांपेक्षाही कमी झोप उच्च रक्तदाब वाढवणारी ठरू शकते, असं सांगण्यात आलंय. संशोधकांना यात असेही आढळून आलंय की पुरुषांच्या तुलनेत महिलांना अपुऱ्या झोपेमुळे हा धोका अधिक असतो. 


सामान्य निष्कर्षानुसार आपल्याला दिवसातून 8 ते 9 तास झोप आवश्यक आहे. आपल्या वयानुसार हे तासांचं गणित बदलणार आहे. चार ते 11 महिन्यांचा बाळाला 12 ते 15 तास झोपेची आवश्यकता असते पण जसे वय वाढते तसे आपली झोप कमी होत जाते. 


अपुऱ्या झोपेने वाढतो वेगवेगळ्या आजारांचा धोका


आपल्या वयानुसार योग्य ती झोप घेतली नाही तर वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन चा अहवालानुसार कमी झोपेमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लठ्ठपणाने नैराशयासारखे जीवघेणे आजार होऊ शकतात. वयानुसार प्रत्येकाला झोपेची आवश्यकता वेगवेगळी असते. आपल्या आरोग्यासाठी झोप अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या वयानुसार आपण किती प्रमाणात झोप घेतली पाहिजे याबाबतीत अनेकांमध्ये संभ्रम असतो. तेव्हा आपल्याला ही गोष्ट जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तेव्हा पाहुयात आपल्या वाढत्या वयानुसार किती तास झोप घेणे आपल्यासाठी फारच आवश्यक आहे.


पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये झोपेचा अभाव अधिक धोकादायक 


पुरुषांच्या तुलनेत ज्या महिला सात तासांपेक्षाही कमी झोप घेतात त्यांना उच्च रक्तदाबाच्या समस्या अधिक उद्भवल्याचे दिसले. पुरुषांच्या तुलनेत महिलांना उच्च रक्तदाबाचा धोका हा सात टक्के अधिक असल्याचे समोर आले. सामान्यतः प्रौढांना रात्री किमान सात ते नऊ तास झोपण्याची शिफारस केली जाते. निद्रानाश किंवा स्लीप एपनिया सारख्या अंतर्निहित झोपेचा विकार देखील खराब झोपेला कारणीभूत ठरू शकतो. स्त्रियांना निद्रानाश, नैराश्य आणि चिंता या सर्व परिस्थितीचे निदान होण्याची अधिक शक्यता असते, ज्याचा निद्रेशी संबंध असतो.


जाणून घ्या वयानुसार किती वेळ झोप घेणे आवश्यक 


O -3 महिने 14 ते 17 तास 
4-11 महिने 12 ते 15 तास 
1-2 वर्ष 11 ते 14 तास 
3 ते 5 वर्ष 10 ते 13 तास 
6 ते 13 वर्ष 9 ते 11 तास 
14 ते 17 वर्ष 8 ते 10 तास 
18 ते 64 वर्ष 7 ते 9 तास 
65 वर्षांवरील 7 ते 8 तास


हेही वाचा:


Health : मळमळ..थंड घाम...थकवा..'अशी' लक्षणं तुम्हालाही असतील तर सावधान! हृदयाच्या रक्तवाहिन्यांत अडथळा असण्याची शक्यता