Men Health: नातं हे एखाद्या रबराप्रमाणे असतं, दोन्हीकडून ताणलं तर ते तुटतं. पण जर एका बाजूने ते सैल सोडलं तर टिकतं. आजकाल घटस्फोटाच्या प्रमाणातही खूप वाढ होताना दिसत आहे. आपण जेव्हा अविवाहित लोकांकडे पाहतो, तेव्हा अधिक आनंदी असतात आणि ते त्यांचे जीवन मुक्तपणे जगतात, ते स्वत:ची योग्यरित्या काळजी घेऊ शकतात, मात्र एका नवीन संशोधनात धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यात असे आढळून आले आहे की अविवाहित पुरुष लवकर वृद्ध होतात, तर विवाहित पुरुषांची वृद्धत्वाची प्रक्रिया अविवाहितांपेक्षा कमी असते. सोप्या भाषेत, अविवाहित लोकांमध्ये वृद्धपणा लवकर जाणवतो. तर विवाहित पुरुष दीर्घकाळ तरुण राहतात. संशोधनात असंही म्हटलंय की, हे फक्त पुरुषांच्या बाबतीत आहे आणि असे बदल स्त्रियांमध्ये होत नाहीत.
विवाहित पुरुषांचे वय अविवाहित पुरुषांपेक्षा हळू वाढते?
न्यू यॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, अलीकडेच एका अभ्यासात असे दिसून आले आहे की विवाहित पुरुषांचे वय अविवाहित पुरुषांपेक्षा हळू वाढते. हा अभ्यास इंटरनॅशनल सोशल वर्क जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. यामध्ये शास्त्रज्ञांनी 20 वर्षे 45 ते 85 वर्षे वयोगटातील प्रौढांचे आरोग्य आणि जीवनमानाचा अभ्यास केला. लग्नाचा आरोग्यावर काय परिणाम होतो आणि विवाहित लोक यशस्वीरित्या वयात येतात की नाही हे जाणून घेणे हा त्यांचा उद्देश होता. या संशोधनात शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, सामाजिक जीवन आणि वयाबद्दलची स्वत:ची धारणा यासारख्या गोष्टी लक्षात घेऊन मूल्यमापन करण्यात आले.
मग त्याचा नकारात्मक परिणाम जाणवतो..
या संशोधनात असे आढळून आले की, विवाहित पुरुष त्यांच्या कधीही लग्न न केलेल्या मित्रांच्या तुलनेत अधिक तरुण दिसतात. मात्र, ते आयुष्यभर विवाहित राहिले तरच हे घडते. जर त्यांचे लग्न तुटले किंवा त्यांच्या जोडीदाराचा मृत्यू झाला तर त्याचा त्यांच्या वृद्धत्वाच्या प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम होतो. त्याच वेळी, विवाहित स्त्रिया आणि कधीही न विवाहित महिला, वृद्धत्वाच्या बाबतीत जवळजवळ समान होत्या. ज्या स्त्रिया विवाहित होत्या, परंतु नंतर घटस्फोटित किंवा विधवा झालेल्या त्यांच्या विवाहित आणि अविवाहित स्त्रियांपेक्षा अधिक दुःखी होत्या.
स्त्रिया एकटं राहण्यात आनंद मानतात, तर पुरुषांसाठी ते कठीण?
शास्त्रज्ञांच्या मते, स्त्रिया एकटं राहण्यात आनंद मानतात, तर पुरुषांसाठी ते कठीण असते. दुसऱ्या एका अभ्यासात असे आढळून आले की स्त्रिया एकट्या राहण्यात अधिक समाधानी असतात आणि त्यांना रोमँटिक संबंधांची कमी गरज असते. याशिवाय महिला त्यांच्या सेक्स लाईफबाबत अधिक समाधानी असतात. तज्ज्ञांचे असे मत आहे की महिलांना त्यांच्या मित्रपरिवाराकडून अधिक पाठिंबा मिळतो, तर लग्नात त्यांना घरातील कामात सहभागी होतात. लग्नानंतर महिलांना त्यांच्या लैंगिक समाधानाकडे दुर्लक्ष करावे लागू शकते.
विवाहित लोक एकटे राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक निरोगी?
अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की विवाहित लोक एकटे राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक निरोगी असतात. जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की विवाहामुळे महिलांच्या मृत्यूचे प्रमाण एक तृतीयांश कमी होते. याशिवाय, नेचर ह्युमन बिहेवियर जर्नलमधील आणखी एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, विवाहित लोकांपेक्षा अविवाहित लोकांना मानसिक समस्या अधिक असतात. हे देखील समोर आले आहे की, विवाहित लोकांपेक्षा अविवाहित लोकांना नैराश्याने ग्रासण्याची शक्यता 79% जास्त असते. हा धोका विधवा महिलांमध्ये 64% आणि घटस्फोटित महिलांमध्ये 99% पर्यंत वाढतो.
हेही वाचा>>>
Men Health: पुरुषांनो.. शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढेल, 'ही' डाळ अत्यंत फायदेशीर, मिळतील 6 जबरदस्त फायदे
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )