Viral: आंबट..तुरट..तिखट...गोड..खारट.. हजमोलाबद्दल सर्वांना माहिती आहे. जेव्हा जेव्हा अपचन होते. तेव्हा विशेषत: भारतीय लोक हजमोला खातात. त्याची गोळी तोंडात टाकताच एक वेगळाच अनुभव येतो. अनेकांना या हाजमोल्याची चटक लागलीय. पण आता केवळ भारतीयच नाही, तर जपानीही त्याचा आनंद घेऊ लागले आहेत. अलीकडेच एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये जपानी लोक पहिल्यांदा हजमोला ट्राय करत आहेत. एवढेच नाही तर त्यांनी खाल्ल्यानंतर ते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. जाणून घ्या...
व्हिडीओमध्ये काय खास आहे?
कोकी शिशिदो या जपानी एन्फ्लुएंसरने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तो जपानमधील आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना हजमोलाची टेस्ट देताना दिसत आहे. कोकी बऱ्याचदा भारतीय संस्कृतीवर आधारित कंटेट तयार करतो आणि त्याच्या एका फॉलोअरने त्याला त्याच्या ग्रुपमध्ये हजमोला ट्राय करून पाहण्याचे आव्हान दिले होते. यानंतर कोकीने आपल्या मित्र आणि नातेवाईकांची हजमोला टेस्ट घेतली आणि नंतर त्यांच्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यात रेकॉर्ड केल्या विशेष म्हणजे ते खाल्ल्यानंतर प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओमधील दोन रेस्टॉरंट मालकांना हा अनुभव मजेदार वाटला आणि त्यांनी तो चांगलाच घेतला. मात्र, अनेकांना त्याची चव फारशी आवडली नाही. येथे आम्ही व्हिडिओ शेअर करत आहोत.
पोस्ट झाली व्हायरल
ही पोस्ट कोकीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आली होती, जी इंटरनेटवर वेगाने व्हायरल झाली. या पोस्टला 6 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि 33000 हून अधिक लाईक्स आहेत. तसेच कमेंट सेक्शनमध्ये अनेक मजेदार प्रतिक्रियाही आल्या आहेत. एका यूजरने सांगितले की त्यांच्या प्रतिक्रिया मजेदार आणि अतिशय गोंडस होत्या. तर दुसरा म्हणाला हिरवी कोथिंबीर चटणी सोबत रोटी ट्राय करून पहा. दुसऱ्या यूजरने सुचवले की त्यांनी डाळिंब किंवा स्वीट टेस्ट करून पाहा, त्यांना ते आवडेल. अशा विविध मजेशीर प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत.
हेही वाचा>>>
Viral: अजबच! ऑफिसमध्ये Swiggy वरून मागवला कंडोम? मग 'असं' काही घडलं की.., पोस्ट झाली व्हायरल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )