Kidney Failure Signs: निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. मूत्रपिंड म्हणजेच किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे, जो शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकण्याचे काम करतो. किडनीमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल, तर ती त्याच्या कार्यक्षमतेवर परिणाम करते. किडनी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतात. जेव्हाही शरीराच्या कोणत्याही भागाला इजा होऊ लागते तेव्हा ते नेहमी काही लक्षणे दर्शवते, ज्याकडे आपण दुर्लक्ष करू नये.


लघवीत होणारे बदल


किडनी खराब होण्याआधी काही संकेत देखील देते. मूत्रपिंड निकामी होण्याची सामान्य चिन्हे लघवीत आढळतात. लघवीतील कोणतेही बदल मूत्रपिंडाचा आजार दर्शवतात. या अवयवातील कोणतीही खराबी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. जाणून घेऊया किडनी निकामी होण्याची लक्षणं.


किडनी निकामी होण्याच्या 7 लक्षणांबद्दल जाणून घ्या..


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर आपल्याला लघवीमध्ये बदल दिसला तर या लक्षणांकडे कधीही दुर्लक्ष करू नये.


तपकिरी लघवी- जेव्हा तुमची किडनी निकामी होऊ लागते तेव्हा लघवीचा रंग गडद तपकिरी होतो. हे चिन्ह अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे उद्भवते.


लघवी कमी होणे- जर तुम्हाला एकाच वेळी लघवी योग्य प्रकारे करता येत नसेल तर हे देखील किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे. या स्थितीत तुम्हाला लघवी कमी आणि कमी वारंवार होऊ शकते.


लघवीत रक्त- अनेक वेळा लघवीत रक्त दिसते. यामध्ये तुम्हाला लघवीसोबत हलके लाल किंवा गुलाबी ठिपके दिसू शकतात, ज्यामुळे लघवीचा रंग वेगळा दिसतो. हे देखील किडनीच्या आजाराचे लक्षण आहे.


सूज - जर तुम्हाला घोट्यावर, बोटांवर आणि चेहऱ्यावर सूज दिसली तर हे देखील किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे.


लघवीमध्ये फेस - जर लघवीमध्ये बुडबुडे आणि फेस दिसत असेल, तर हे देखील तुमच्या मूत्रपिंडात काही समस्या असल्याचे लक्षण आहे.


ड्राय स्किन- नॅशनल किडनी फाऊंडेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, जर आपली त्वचा खूप कोरडी असेल आणि आपल्याला खाज सुटत असेल तर हे देखील किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे.


झोपेचा अभाव – जेव्हा किडनी खराब होऊ लागते तेव्हा शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत, ज्यामुळे झोपेची समस्या उद्भवू शकते. अशा स्थितीत तुम्हाला विशेषतः रात्री झोप येत नाही.


निरोगी किडनीसाठी काय काळजी घ्याल?



  • तुमची किडनी निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल, जसे

  • पुरेशा प्रमाणात पाणी प्या.

  • मिठाचे सेवन कमी करा.

  • तुमचे वजन नियंत्रणात ठेवा.

  • रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवा.

  • नियमित व्यायाम करा,

  • विशेषतः श्वासोच्छवासाचे व्यायाम.


हेही वाचा>>>


Women Health: मासिक पाळी चुकली? किती उशीरानं पाळी येणं सामान्य? गर्भधारणा व्यतिरिक्त, ही 3 कारणं, तुमच्या प्रश्नांची उत्तरं इथे आहेत


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )