Washim: सुखा मेवा म्हणून ओळख असणारी (बिब्बा )गोडंबीच्या दरात प्रचंड वाढ दिसून येतेय. 900 रुपये प्रति किलो विकल्या जाणारी गोडंबी गेल्या काही दिवसात 1400 ते 1700 किलो विक्रीने विकली जात आहे. थंडीचे प्रमाण वाढल्याने गोडंबी  मागणी वाढल्याने गोडंबीच्या दरात 50 ते 60 टक्के दरवाढ वाढ झाली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला सुखा मेवा म्हणून बिब्याची गोडंबी मोठी पोषक आणि आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने गोडंबीच्या मागणीत मोठी वाढ होते. त्यामुळे थोडी थोडी करता गेल्या काही दिसत जवळपास 600 ते 800 किलो पर्यंत बिब्याच्या गोडंबीचे दर वाढल्याचे समोर आलंय. शरीराला पोषक आणि सुख्या मेवाला पसंती देणारे ग्राहकांना खिसा काहीसा मोकळा करावा लागत आहे.


हिवाळ्यात बिब्याच्या गोडंबीच्या ग्राहकांकडून मोठी मागणी. डॉक्टर सांगतात..


डॉक्टरच्या मते इतर हंगामा मध्ये बिब्बा गोडंबी सेवन करणे मानवी आरोग्यासाठी इतर आजारांना निमंत्रण करणारी आहे... तर थंडीच्या दिवसात सेवन केल्यास  मानवी शरीराला विविध आजारापासून श्वसनविकार, वाताचे विकार, पोटाचे विकार आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढीकरीता म्हणून बिब्बा गोडंबीचा वापर फायदेशीर ठरते...


हिवाळ्यात बिब्याच्या गोडंबीच्या दरात प्रचंड वाढ.  


तर ड्रायफूट विक्रेतेच्या मते उन्हाळ्यामध्ये याची मागणी नगण्य असते. काही प्रमाणात पावसाळ्यात मागणी असते तर हिवाळ्यामध्ये गोडंबी मागणी अधिक असल्याने गोडंबीच्या दरात प्रचंड वाढ होत आहे वाशिम जिल्ह्यात गोडंबी जास्त निर्मिती होत असल्याने इतर जिल्ह्याच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यात दर कमी आहे मात्र इतर जिल्ह्यात पंधराशे ते सतराशे अठराशे रुपये पर्यंत दर वाढलेली दिसतात त्याचं कारण म्हणजे थंडीचा वाढलेला जोर....


बिब्बा फोडण्याचा जीवघेणा उद्योग 


वाशिम जिल्ह्यात आदिवासी भागात आज बिब्बा फोडण्याचा जीवघेणा उद्योग गेल्या अनेक दशकापासून अविरतपणे सुरु आहे. बिब्बा फळ हा जंगलात आढळून येतो. कर्नाटक तेलांगना महाराष्ट्र या सह उत्तर प्रदेश च्या जंगलात मोठ्या प्रमाणात  उपलब्ध आहे,  मात्र बिब्बा उद्योग मोठा जीवघेणा आहे, वाशीम जिल्ह्यात उद्योग धंदे नसल्याने जिल्हातील आदिवासी भागात महिला प्राधान्याने  हा उद्योग करतात. एक किलो बिब्बा गोडंबी  फोडण्यासाठी 100 ते 150  रुपये रोज मजुरी महिलांना मिळते.  मात्र बिब्बा फोडताना  त्त्यातून निघणारा रासायनिक तेल द्रव्य इतका  घातक आहे कि अंगावर त्याची वाफ दाली तरी अनेक त्वचेचे विकार होतात, शरीरावर काळे डाग उमटतात, त्यामुळे त्वचा आयुष्यभर काळी पडते.