Foods To Avoid For Arthritis : वयाबरोबर लोकांना संधिवाताचा त्रास होऊ लागतो. हिवाळ्यात सांधेदुखीच्या रुग्णांचा त्रास वाढतो. थंडीमुळे हाडे आणि गुडघे दुखू लागतात. वास्तविक, हाडांच्या सांध्यांमध्ये युरिक अॅसिड वाढल्याने सांधेदुखी सुरू होते. त्याला संधिवात म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, भारतात दर पाचपैकी एकाला संधिवात आहे. पूर्वी हा आजार फक्त वयोवृद्ध लोकांमध्ये दिसून येत होता, पण आता तरूणांनाही सांधेदुखीचा त्रास होत आहे. त्यामुळे चालणे सर्वात कठीण होते. मात्र, घरगुती उपायांनी सांधेदुखी बऱ्यापैकी बरी होऊ शकते. चला जाणून घेऊया हिवाळ्यात सांधेदुखीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी खाव्यात.
हिवाळ्यात सांधेदुखीच्या रुग्णांनी 'या' गोष्टी खाव्यात
1. लसूण : हिवाळ्यात लसणाचा आहारात नक्कीच समावेश करा. लसूण खाल्ल्याने सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. लसणात सल्फर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. जे लोक रोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 2-3 पाकळ्या खातात, त्यांना सांधेदुखीच्या समस्येत खूप आराम मिळतो.
2. मेथी : सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मेथीचे सेवन जरूर करावे. मेथीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे सांधेदुखीविरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. मेथीमध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स आढळतात, ज्यामुळे सांधेदुखीमध्ये आराम मिळतो. सांधेदुखीच्या रुग्णाने 2 चमचे मेथी पाण्यात उकळून पाणी प्यावे. तुम्ही ते रिकाम्या पोटी चहासारखे पिऊ शकता.
3. धणे : सांधेदुखीत भरपूर अँटीऑक्सिडंट घटक आढळतात. यामुळे सांधेदुखीत आराम मिळतो. सांधेदुखीसाठी धणे खूप फायदेशीर आहे. सांधेदुखीच्या रुग्णांनी पाण्यात भिजवलेले धणे खाणे फायदेशीर आहे. तुम्हाला हवे असल्यास कोमट पाण्यात धने पावडर टाकून पिऊ शकता. याच्या सेवनाने सांधेदुखीमध्ये आराम मिळेल.
आहार कसा घ्यावा?
- सांधेदुखीच्या रुग्णांनी आहारात अधिकाधिक हिरव्या भाज्यांचा समावेश करावा.
- मोसंबी आणि हंगामी फळे खाल्ल्याने सांधेदुखीत आराम मिळतो.
- सांधेदुखीचा त्रास दूर करण्यासाठी दूध आणि दह्याचेही सेवन करावे.
- सांधेदुखीच्या रुग्णानेही मोड आलेले मूग आणि हरभरा खावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :