Japanese Fever Symptoms: तुम्ही कधी जापानी तापाबाबत (Japanese Fever) ऐकलंय का? हा सामान्य ताप नसून अत्यंत घातक ताप आहे. यामुळे रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. याच तापाचा कहर सध्या भारतात सुरू आहे. मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये जपानी तापाच्या (Fever Symptoms) लसीकरणासाठी मोठी मोहीम राबवली जात आहे. अशा परिस्थितीत 1 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देत आहेत. आरोग्य विभागाकडून बेफिकीर न राहता काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत तुमच्या घरात या वयाची मुलं असतील, तर त्यांची विशेष काळजी घ्या. 


जपानी ताप अत्यंत धोकादायक, थोडसं दुर्लक्षही पडेल महागात 


जपानी एन्सेफलायटीसला जपानी ताप असंही म्हणतात. हा एक जीवघेणा आजार आहे, जो डासांमुळे होतो. हे डास सहसा फ्लेविव्हायरस संक्रमित असतात. जपानी ताप संसर्गजन्य नाही, याचा अर्थ तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरत नाही. या तापाची माहिती डास चावल्यानंतर 5 ते 15 दिवसांनी दिसून येते. यापासून बचाव करण्यासाठी मुलांना लस दिली जाते. हा आजार धोकादायक मानला जातो, कारण जपानी तापाची लक्षणं वाढल्यास पक्षाघात किंवा कोमा सारखी परिस्थिती होण्याचा धोका असतो.


जपानी तापाची लक्षणं काय? (What Are Symptoms Of Japanese Fever?)



  • डोकेदुखी किंवा ब्रेन टिश्यूना सूज येणं किंवा न्यूरॉलॉजिकल समस्य होण्याचा धोका 

  • तीव्र ताप 

  • डोकेदुखी 

  • ताठ घसा

  • अंगदुखी

  • थंडी वाजणं  

  • फिट्स येणं 


जपानी तापावर उपचार काय? (What Is Treatment For Japanese Fever?)


जपानी तापाच्या विळख्यात एकादी व्यक्ती अडकलं की, त्यानं त्यावर त्वरित उपचार घेणं गरजेचं असतं. जपानी तापाच्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल केलं जातं. त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करणंही आवश्यक असतं. त्याला ऑक्सिजन मास्कही लावला जातो. कारण जपानी ताप आलेल्या व्यक्तीला ऑक्सिजन मास्क लावला जातो. व्यक्तीची प्रकृती बिघडल्यास वॅक्सिनही दिलं जातं. 


जपानी ताप टाळण्यासाठी काय करावं? 



  • घराभोवतीची स्वच्छता ठेवा 

  • जेव्हा हवामान बदलतं किंवा पाऊस पडतो, तेव्हा आपलं शरीर झाकलं जाईल असेच कपडे वापरा, त्यामुळे डासांपासून संरक्षण करा

  • झोपताना मच्छरदाणी जरूर वापरा 

  • 1 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांना लसीकरण करणं आवश्यक आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Dermatomyositis Symptoms: किशोरवयीन मुलांमधील डर्माटोमायोसिटिसबाबत तुम्हाला माहितीय? साधं इन्फेक्शन वाटतं पण जीवघेणं ठरतं!