IVG: निसर्गाचा नियमच आहे की, कोणत्याही पुरूष किंवा स्त्रीशिवाय मूल जन्माला येऊ शकतच नाही. मात्र जर तुम्हाला असं सांगण्यात आलं की, या दोघांशिवाय मुलं जन्माला येऊ शकतात? तर कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही, कारण शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की पुढील 10 वर्षांमध्ये स्त्री आणि पुरुषांशिवाय मुलं जन्माला येऊ शकतात. मात्र, ते पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी सिद्ध करण्यासाठी अजून संशोधन आणि चाचणी आवश्यक आहे. ब्रिटनच्या ह्युमन फर्टिलायझेशन अँड एम्ब्ब्रियोलॉजी अथॉरिटीने (एचएफईए) नुकताच एक अभूतपूर्व खुलासा केला आहे, ज्यामुळे जगाला धक्का बसला आहे. जाणून घेऊया सविस्तर


विज्ञानाचं निसर्गाला आव्हान?


तुम्ही कधी अशा जगाची कल्पना केली आहे का? जिथे पुरुष किंवा स्त्रिया यांच्याशिवाय मुल जन्माला येऊ शकते? हे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटातील कथेसारखे वाटत असले तरी, विज्ञान ते प्रत्यक्षात आणण्याच्या मार्गावर आहे.  ब्रिटनच्या ह्युमन फर्टिलायझेशन अँड एम्ब्ब्रियोलॉजी अथॉरिटीने (एचएफईए) नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे ज्यामुळे जगाला धक्का बसला आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत अंडी आणि शुक्राणू वाढवण्याचे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणण्याच्या अगदी जवळ आले आहेत. इन विट्रो गेमेट्स (IVG) म्हणून ओळखले जाणारे हे तंत्रज्ञान भविष्यात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकते. काय आहे हे IVG तंत्रज्ञान? जाणून घेऊया..


IVG तंत्रज्ञान काय आहे?


IVG हे एक तंत्र आहे, ज्यामध्ये प्रयोगशाळेत मानवी अंडी आणि शुक्राणू तयार करण्यासाठी अनुवांशिकरित्या त्वचा किंवा स्टेम पेशींचे पुनर्प्रोग्रामिंग केले जातो. एचएफईएचे सीईओ पीटर थॉम्पसन यांनी एका मीडिया स्टेटमेंटमध्ये या तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवी मूल निर्माण करण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, या तंत्रज्ञानामुळे मानवी अंडी आणि शुक्राणूंची उपलब्धता लक्षणीयरीत्या वाढू शकते.


अनेक लोकांसाठी वरदान ठरणार?


शास्त्रज्ञांच्या मते, जर हे तंत्रज्ञान यशस्वी झाले, यासोबतच ते सुरक्षित, प्रभावी आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह झाले, तर ते अनेक लोकांसाठी वरदान ठरू शकते. ज्या जोडप्यांना विविध कारणांमुळे मूल होऊ शकत नाही त्यांना हे मदत करू शकते. शिवाय, समलिंगी जोडप्यांचे जैविक मूल जन्माला घालण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते.






IVG तंत्रज्ञानाचे तोटे काय असू शकतात?


शास्त्रज्ञांच्या मते, या अभूतपूर्व वैद्यकीय पद्धतीमुळे अनेक नैतिक जोखमींचा धोकाही निर्माण होऊ शकतो. आत्तापर्यंतच्या संशोधनातून असे समोर आले आहे की, या नवीन तंत्रज्ञानाला बाळंतपणाशी संबंधित कायद्यांमध्ये मान्यता नाही. हे नवीन तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास नियमांमध्ये बदल करण्याची गरज भासणार आहे. याशिवाय या प्रक्रियेमुळे समाजातील कुटुंबाची पारंपरिक संकल्पना बदलणार का? असा प्रश्न उपस्थित होतो. यामुळे अनुवांशिक विकारांचा धोका देखील वाढू शकतो, कारण प्रत्येकामध्ये काही दोषपूर्ण गुणसुत्रे असतात. साधारणपणे, यामुळे समस्या उद्भवत नाहीत, कारण आईआणि वडिलांकडून आपल्याला प्रत्येक गुणसुत्रांच्या दोन प्रती वारशाने मिळतात. सोलो पेरेंटिंगमध्ये, दोन्ही प्रती एकाच व्यक्तीकडून येतात, ज्यामुळे अनुवांशिक समस्या अधिक संभवतात.


 


हेही वाचा>>>


Weight Loss: 5 महिन्यांत कमी केलं चक्क 33 किलो वजन? नवज्योत सिंह सिद्धूंचं वेट लॉसचं रहस्य 'हे' 5 नियम, अनेकांना माहीत नाही..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )