Pet Animals: अनेकांना प्राणी पाळण्याची आवड असते. काही लोकांनी त्यांच्या घरी कुत्रा किंवा मांजर पाळलेली तुम्ही पाहिली असेल. वेगवेगळ्या ब्रिडच्या मांजरी किंवा कुत्रा अनेकांच्या घरात असतो. एका सर्वेमध्ये असे दिसून आले आहे की, 69 टक्के ऑस्ट्रेलियन कुटुंबांमध्ये किमान एक पाळीव प्राणी आहे. पाळीव प्राण्यांचे लाड करणे, त्यांना फिरायला घेऊन जाणे, त्यांचे आवडते खाद्य त्यांना देणे तसेच त्यांच्या चेहऱ्याचे चुंबन घेणे या सर्व गोष्टी करायला काही लोकांना आवडतात. पण पाळीव प्राण्यांमुळे कोणते आजार होऊ शकतात? याबाबत तुम्हाला महित आहे का?
पाळीव प्राण्यांमुळे कोणते रोग घेऊ शकतात?
प्राण्यांकडून माणसांमध्ये येणाऱ्या संसर्गजन्य रोगांना झुनोटिक रोग किंवा झुनोसेस म्हणतात. कधीकधी, झुनोटिक रोगवाहक असलेले पाळीव प्राणी हे आजारी पडल्यासारखे दिसू शकतात. परंतु बर्याचदा झुनोटिक रोगवाहक प्राण्यांची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. झुनोसेस थेट पाळीव प्राण्यांपासून मानवांमध्ये प्रसारित होऊ शकतो. प्राण्यांची लाळ, त्यांच्या शारीरातील द्रव्य आणि विष्ठा यांच्या संपर्काद्वारे झुनोसेस होऊ शकतो. अभ्यासानुसार, पाळीव प्राण्यांकडून झुनोसेसचा धोका कमी आहे. कुत्रे आणि मांजरी हे विषाणू, जीवाणू, बुरशी आणि परजीवी यांच्यामुळे होणाऱ्या झुनोटिक संसर्गाचे प्रमुख रिजर्वायर आहेत.
कुत्र्याच्या तोंडात आणि लाळेमध्ये कॅपनोसाइटोफागा बॅक्टेरिया असतो. जो कुत्र्याच्या संपर्कात आल्यानंतर किंवा कुत्र्याच्या चावण्याद्वारे लोकांमध्ये प्रसारित होऊ शकतो. यामुळे अनेक लोक आजारी पडत नाहीत, परंतु हे जीवाणू कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांमध्ये प्रसारित होऊ शकतात, परिणामी त्यांना गंभीर आजार होऊ शकतो.
मांजरीशी संबंधित झुनोसेसमध्ये विष्ठा-तोंडी मार्गाने पसरणारे अनेक आजार आहेत, जसे की जिआर्डिआसिस, कॅम्पिलोबॅक्टेरिओसिस, सॅल्मोनेलोसिस आणि टॉक्सोप्लाझोसिस. याचा अर्थ आपल्या मांजरीच्या विष्ठेचा ट्रे हाताळ्यानंतर आपले हात धुणे किंवा हातमोजे वापरणे महत्वाचे आहे. मांजरींच्या चाव्याव्दारे आणि ओरखड्यांद्वारे देखील संक्रमण होऊ शकते.
कुत्रे आणि मांजरी हे दोन्ही मेथिसिलिन-प्रतिरोधक जीवाणू स्टॅफिलोकोकस ऑरियस (एमआरएसए) साठीचे रिजर्वायर आहेत, जो पाळीव प्राण्यांशी जवळचा संपर्क झुनोटिक संक्रमणासाठी एक महत्त्वाचा धोका घटक म्हणून ओळखला जातो. केवळ कुत्रे आणि मांजरीच नाही जे मानवांमध्ये रोग पसरवू शकतात. पक्षी, कासव आणि मासे देखील रोग पसरवू शकतात.
जपानमधील एका महिलेने तिच्या कुत्र्याच्या चेहऱ्याचे चुंबन घेतल्यानंतर तिला पाश्चरेला मल्टीकोडा संसर्गामुळे मेंदुज्वर झाला. हे जीवाणू अनेकदा कुत्रे आणि मांजरींच्या तोंडीतील पोकळीत आढळतात. पाळीव प्राण्यापासून आजार होण्याची भीती अनेकांना वाटत असते.
पाळीव प्राणी पाळताना तुम्ही या टीप्स फॉलो करु शकता-
1.तुमच्या पाळीव प्राण्यासोबत खेळल्यानंतर आणि त्याच्या खेळणींना हात लावल्यानंतर तसेच त्याची विष्ठा साफ केल्यानंतर तुमचे हात धुवा.
2.पाळीव प्राण्यांना तुमचा चेहरा किंवा उघड्या जखमा चाटू देऊ नका.
3.लहान मुले पाळीव प्राण्यांशी खेळत असताना त्यांचे निरीक्षण करणे.
4.पाळीव प्राण्यांची विष्ठा साफ करताना हातात प्लॅस्टिकचे Gloves घाला.
5.पाळीव प्राण्यांना स्वयंपाकघर येऊ देऊ नका.
6.तुमचा पाळीव प्राणी आजारी आहे ,असे तुम्हाला वाटत असल्यास पशुवैद्याकडे त्याला घेऊन जा.
7.जर तुम्ही पाळीव प्राणी घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या पशुवैद्याचा सल्ला घ्या.
इतर महत्वाच्या बातम्या:
Pet Care Tips : घरात पाळीव प्राणी असतील तर पावसाळ्यात अशी घ्या काळजी..