Pet Care Tips : घरात पाळीव प्राणी असतील तर पावसाळ्यात अशी घ्या काळजी..
पावसाळा हा अनेक गंभीर आजारांना आमंत्रण देतो. अशातच आपल्या स्वता:च्या आरोग्यासोबतच घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घेणे फार गरजेचे असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपावसाळ्यात घरातून बाहेर पडताना तुमच्या घरात असणाऱ्या कुत्र्याला किंवा मांजरीला रेनकोट घाला. आॅनलाई शाॅपिंगच्या अनेक वेबसाईट्सवर घरातील पाळीव प्राण्यांकरता रेनकोट उपलब्ध आहेत.
बाहेरुन आल्यानंतर त्यांना सुती टाॅवेलने स्वच्छ पुसून घ्या. तसेच त्यांच्या झोपण्यासाठी उबदार कापड ठेवा.
पावसाळ्यात ओलसर वातावरणामुळे गोचिड आणि पिसूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे तुमच्या घरातल्या प्राण्याला वेळेत सगळ्या आवश्यक असणाऱ्या लस देऊन घ्या
पावसाळ्यात तु्म्ही तुमच्या प्राण्यांना बाहेर फिरायला घेऊन जात नसाल तर त्यांच्याकरता घरातच खेळण्याची सोय करा.
घरात सर्वत्र साफसफाई करणे पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गरजेचे आहे. शक्यतो फायबर किंवा स्टीलच्या भांड्यात घरातील कुत्रा किंवा मांजरांना खायला द्या.
लेप्टोस्पायरोसिस हा पावसाळ्यात होणारा सामान्य आजार आहे. तुमच्या पशुवैद्यकाने तुम्हाला सांगितल्यास लेप्टोस्पायरोसिस लसीसह तुमच्या पाळीव प्राण्याचे लसीकरण करुन घ्या.
पावसाळ्यात कुत्रा किंवा मांजरीचे केस नियमित स्वच्छ करणे गरजेचे आहे. सोबतच दिवसातून दोन वेळा त्यांना आंघोळ घाला.
पावसाळ्यात किटकांचे प्रमाण वाढते. यामुळे अनेक आजार बळावतात. यामुळे कीटकनाशके आणि इतर रसायनांचा वापर पावसाळ्यात वाढतो. अशा वेळी घरातील पाळीव प्राण्यांना कीटकनाशकांपासून दूर ठेवा.
बाहेरुन फिरून आल्यानंतर तुमच्या घरातील कुत्रा किंवा मांजरीचे पंजे साफ करा.यामुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग त्यांना होणार नाही.