Improve Eyesigte: अनेक लोक कित्येक तास लॅपटॉप (Laptop) किंवा कम्प्युटरच्या (Computer) स्क्रिनसमोर काम करतात. आठ ते नऊ तास लॅपटॉप किंवा कम्प्युटरच्या स्क्रिनसमोर बसून तुम्ही काम करत असाल, तर तुमच्या डोळ्यांवर (Eyes) त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. काही लोक लॅपटॉपच्या स्क्रिन समोर काम करताना चष्मा घालतात. ज्यामुळे लॅपटॉप किंवा कम्प्युटरमधून येणारे UV Radiations थेट डोळ्यांवर पडत नाहीत. डोळ्यांची काळजी (Improve Eyesigte) घेण्यासाठी तुम्ही काही घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करु शकता-


फॉलो करा या सोप्या टिप्स


डोळ्यांना लावा गुलाब पाणी (Rose water)
रात्री झोपताना एका कापसावर गुलाब पाणी टाकून तो कापूस डोळ्यांभोवती फिरवा. ज्यामुळे डोळ्यांना आराम मिळेल. तसेच कापूस गुलाब पाण्यामध्ये बुडवून तो डोळ्यांवर 15 मिनिटे ठेवू शकता. ज्यामुळे डोळ्यांवर आलेला ताण कमी होतो. 


गायीचं तूप (Ghee)
आहारात गायीच्या तुपाचे सेवन तुम्ही करु शकता. ज्यामुळे दृष्टीसाठी चांगली होते. त्यामुळे आहारात गायीच्या तुपाचा समावेश करा. 


त्रिफला चूर्ण


पचन क्रिया सुधारण्यासाठी त्रिफळा चुर्ण अनेक लोक खातात, पण त्रिफळा खाल्ल्याने दृष्टीही सुधारते हे फार कमी लोकांना माहिती आहे. दृष्टी सुधारण्यासाठी त्रिफळा चुर्ण आठवड्यातून दोन वेळा खावे. रोज रात्री झोपण्याआधी स्वच्छ पाणी डोळ्यांच्या बाहेरी बाजूला लावा. ज्यामुळे डोळ्यांमध्ये गेलेली धूळ जाते. 


रात्री झोपण्यापूर्वी नाभीला मोहरीचे तेल लावल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे दृष्टी चांगली होते. ओठ मऊ राहतात. त्वचा चांगली होते. पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. गवतावर अनवाणी चालल्याने दृष्टी तीक्ष्ण होते. तसेच  सकाळी गवतावर पडलेल्या दव-थेंबांवर रोज अनवाणी चालत राहिल्यास डोळ्यांची दृष्टी चांगली होते, असंही म्हटलं जातं.


बडीशेप खाल्ल्याने डोळ्यांवरील ताण कमी होतो. कारण यामध्ये आढळणारे पोषक तत्व योग्य प्रमाणात सेवन केल्यास डोळ्यांच्या रक्तवाहिन्या विस्तारण्यास मदत होते. रोज जेवल्यानंतर बडीशेप तुम्ही खाऊ शकता. 


Disclaimer : या लेखात नमूद केलेले दावे फक्त सूचना आणि माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा याची पुष्टी करत नाही. कोणतेही उपचार/औषध/आहार आणि सूचना लागू करण्यापूर्वी, कृपया डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्या.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Superbug Bacteria : आता सुपरबग बॅक्टेरियाचा धोका; संसर्गाची लक्षणे, परिणाम काय? सर्व काही वाचा सविस्तर