Corona, Flue And Viral Fever Symptoms : देशासह राज्यात वारंवार येणाऱ्या उष्णतेच्या लाटांमुळे (Heat Wave) अंगाची लाहीलाही होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे पुन्हा एकदा कोरोनाची (Covid-19) धास्ती वाढली आहे. अशातच उन्हाळ्यात पुन्हा एकदा व्हायरल आजार, ताप आणि कोरोना तिनही गोष्टींचा संसर्ग होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, अनेक लोक इतर व्हायरल आजारांनी त्रस्त आहेत. या वातावरणात ताप, खोकला, सर्दीच्या समस्या अनेकांना सतावत आहेत. यामध्ये आणखी एक गोष्ट सर्वांना त्रासदायक ठरतेय, ती म्हणजे, नक्की या समस्या वातावरण बदलामुळे उद्भवल्यात की, कोरोनाची लागण झालीये? हा फरकच ओळखणं कठीण झालं आहे. 


व्हायरल आणि कोविड-19 ची लक्षणं एकसारखीच असतात, त्यामुळे अनेकदा संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे अशावेळी अधिक सावध होणं गरजेचं असतं. सर्वात आधी कोरोना आणि व्हायरल ताप यांची लक्षण जाणून घेणं गरजेचं आहे. जाणून घ्या कोरोना आणि व्हायरल तापाची लक्षणं काय आहेत? 


व्हायरल तापाची लक्षणं बऱ्याच अंशी कोरोनाच्या लक्षणांशी मिळतीजुळती असतात. कोरोना व्हायरसच्या अनेक रुग्णांमध्ये सामान्य लक्षं दिसून येतात. त्यामुळेच आपल्याला आलेला ताप, कोरोनाचा की, व्हायरल हे ओळखणं कठिण होतं. नॉर्मल ताप किंवा व्हायरल ताप साधारणतः 5 ते 6 दिवसांत बरा होतो. जाणून घ्या... 


व्हायरल तापाची लक्षणं



  • ताप

  • अंगदुखी

  • स्नायू दुखणं

  • खोकला

  • सर्दी किंवा नाक बंद होणं 

  • डोकेदुखी


कोरोनाची लक्षणं 



  • सतत भिती वाटणं आणि ताप येणं 

  • घशात खवखव आणि खोकला 

  • झोपेत बरळणं 

  • ब्रेन फॉग​ किंवा भास होणं 

  • हायपोक्सिया

  • त्वचेवर रॅशेज किंवा रंग बदलणं 

  • चव आणि गंध न येणं 

  • श्वास घेण्यास त्रास आणि हार्ट रेट वाढणं 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.