Winter Headache : डोकेदुखी (Headache) ही खूप सामान्य आहे. अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. हिवाळ्यात अनेक जणांना वारंवार डोकेदुखीचा त्रास जाणवतो. या डोकेदुखीची इतरही अनेक कारणे आहेत, मानसिक ताण, डोळ्यांवरचा ताण,अशक्तपणा, बद्धकोष्ठता, चिंता ही यातील काही कारण आहेत. त्याचबरोबर काही आजारांमुळेही डोकेदुखीचा त्रासही होतो. ज्यामध्ये सायनस, सर्दी आणि उच्च रक्तदाब यांचा समावेश आहे. जर तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर यावरील वेळी उपचार करण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही गोळ्या घेण्याऐवजी आयुर्वेदिक उपचार पद्धती वापरून पाहा तुम्हाला नक्की फायदा मिळेल.


हिवाळ्यात डोकेदुखीपासून सुटका कशी मिळवाल?


लसुणाच्या पाकळ्या


हिवाळ्यात डोकेदुखीचा त्रास होत असेल तर लसणाच्या पाकळ्यांचे सेवन करा. रोज लसणाच्या कळ्या चघळल्याने डोकेदुखीची समस्या दूर होते.


बदाम


डोकेदुखी कमी करण्यासाठी बदाम तुमच्यासाठी लाभदायक ठरु शकतात. यासाठी बदाम रात्रभर भिजवून ठेवावेत. सकाळी बदाम बारीक करून त्यात थोडे गरम तूप मिसळून याचं सेवन करा. यामुळे डोकेदुखीची समस्या दूर होण्यास मदत होईल.


दालचिनीची पेस्ट


थंडीत डोकेदुखीची समस्या दूर करण्यासाठी दालचिनीची पेस्ट लावा. यामुळे डोकेदुखीपासून सुटका मिळेल. यासाठी दालचिनी बारीक करून त्यात थोडे पाणी घालून त्याची जाडसर पेस्ट बनवा. ही पेस्ट कपाळावर लावा आणि काही वेळ राहू द्या. यामुळे डोकेदुखी दूर होऊ तुम्हाला आराम मिळेल.


धणे आणि खडीसाखरेचा काढा


डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी धणे आणि खडीसाखर यांच्या काढा प्यायल्याने तुमच्या आरोग्यदायी लाभदायक ठरु शकते. हा काढा तयार करण्यासाठी एक कप पाणी घ्या. हे पाणी चांगले उकळवा. यानंतर त्यात एक चमचा धणे आणि एक चमचा खडीसाखर  मिसळा. आता हा काढा चहाप्रमाणे प्या. यामुळे खूप आराम मिळेल.


आवळ्याचे तेल


डोकेदुखीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी सुका आवळा आणि मोहरीच्या तेलाचे मिश्रण देखील आरोग्यदायी ठरू शकते. यासाठी एक बरणी घ्या. त्यात मोहरीचे तेल आणि थोडा सुका आवळा घाला आणि सुमारे 10 दिवस हे मिश्रण मुरू द्या. त्यानंतर हे तेल डोक्याला लावा. यामुळे डोकेदुखीची समस्या दूर होईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


महत्वाच्या बातम्या :