Health Tips : तुम्हाला जर शारीरिकदृष्ट्या फिट आणि निरोगी राहायचं असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मीठ (Salt), साखर (Sugar) आणि तेलाचे (Oil) प्रमाण कमी केले पाहिजे. हे असे पदार्थ आहेत ज्यांचा रोजच्या जेवणात अगदी सर्रास वापर केला जातो. परंतु, लोकांना आहारात किती प्रमाणात या पदार्थांचा वापर करावा याबाबत फारशी कल्पना नसते. खरंतर, हे तीन पदार्थ अनेक रोगांचं मूळ कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्व देशांना याबाबत सतर्क केले आहे. त्यामुळे अनेक देशांनी बाजारात विकल्या जाणार्‍या उत्पादनांवर मीठ, साखर आणि फॅटचे प्रमाण पाहून बंदी घातली आहे. 


दिवसातून मीठ, साखर आणि तेलाचे प्रमाण किती असावे?


WHO च्या मते, आपण 1 दिवसात 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी घातक आहे. एका दिवसात 6-8 चमचे साखर आणि 4 चमचे तेल यापेक्षा जास्त खाऊ नये. मात्र, भारतात याचे सेवन अगदी सर्रास केले जाते.   


अधिक प्रमाणात या पदार्थांचे सेवन केल्यास...


मीठ, तेल किंवा साखर जास्त प्रमाणात वापरल्यास त्यातून अनेक प्रकारचे आजार उद्भवू लागतात. या पदार्थांमुळे हृदयविकार, किडनी आणि मधुमेह सारखे आजार खूप लवकर होतात. बदलती जीवनशैली, आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, याऊलट तुम्ही आहारात मीठ, तेल, आणि साखरेचे प्रमाण कमी केल्यास लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे आजार दूर होतील.   


अति प्रमाणात मीठाचा वापर केल्यास...


बाजारात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये बहुतांश मीठ असते. तळलेले काजू आणि बटाट्याच्या वेफर्समध्ये मीठ भरपूर असते. याशिवाय नूडल्स, सॉस आणि पॅकेट सूप हेही आरोग्यासाठी हानिकारक आहेत. जास्त मीठ आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे रक्तदाब वाढतो जो हृदयासाठी धोकादायक असतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


महत्वाच्या बातम्या :