Health Tips : पावसाळ्याला (Monsoon) सुरुवात झाली असून या बदलत्या ऋतूत आरोग्याकडे (Health) विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. पावसामुळे कडाक्याच्या उन्हापासून नक्कीच दिलासा मिळाला असला तरी या ऋतूत लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत जाते. एवढेच नाही तर, पावसाळ्यात संसर्ग आणि किरकोळ आजारांचा धोका वाढतो. त्याचा मूत्रपिंडाच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्याची वेळीच काळजी घेतली नाही तर किडनीशी (Kidney) संबंधित गंभीर आजार होतात.
पावसाळ्यात 'या' आजारांचा वाढतो धोका
खरंतर पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. कारण जर तुम्ही चुकून बाहेरचे प्रदूषित पाणी किंवा विषारी अन्नाच्या संपर्कात आलात तर त्याचा तुमच्या किडनीवर परिणाम होतो. त्यामुळे या ऋतूत 'बॅक्टेरियल इन्फेक्शन लेप्टोस्पायरोसिस'चा धोका वाढतो. कारण त्यामुळे किडनी सहज खराब होते. तुम्हाला माहिती आहेच की पावसात डेंग्यू, टायफॉईड, डायरिया, हिपॅटायटीस ए आणि हिपॅटायटीस बी चा धोका जास्त असतो. कारण या सर्व आजारांमुळे तुमच्या किडनीला खूप नुकसान होते.
पावसाळ्यात किडनीचे आजार टाळायचे असतील तर करा 'हे' काम
तुम्हाला जर तुमची किडनी पूर्णपणे निरोगी ठेवायची असेल किंवा संसर्गापासून वाचवायची असेल, तर जास्तीत जास्त पाणी प्या. भरपूर पाणी किंवा ज्यूस प्या. पावसाळ्यात पाणी उकळून थंड झाल्यावर प्यावे. याशिवाय तुम्ही फळांचा रस, ताक तसेच इतर रस पिऊ शकता.
साचलेल्या पाण्यात पोहणे टाळा
पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचतं. अशा पाण्यात पोहणे टाळा. तसेच, आपले हात वारंवार साबणाने धुवा. डासांपासून दूर राहा.
पावसाळ्यात अन्न नीट शिजवून खा
पावसाळ्यात बाहेरचे किंवा कमी शिजलेले अन्न खाणे टाळा. कारण जर तुम्ही बाहेरचे अन्नपदार्थ खाल्ले तर त्याचा तुमच्या किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. कारण, हे पदार्थ फार अस्वच्छ असतात. त्यामध्ये अनेक बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याची भीती असते. म्हणून पावसाळ्यात घरी शिजवलेल्या अन्नाचं सेवन करा. यामुळे तुम्ही आजारीही पडणार नाही आणि तुमच्या किडनीवरही त्याचा परिणाम होणार नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :