Almond Tea Benefits : सर्वांच्याच घरात आजकाल ड्रायफ्रुट्स असतात. त्यात सकाळी रिकाम्या पोटी अनेक जण भिजवलेले बदाम (Almond) घरातील लहान मुलांना तसेच मोठ्यांना खायला देतात. ज्यामुळे बुद्धी तीक्ष्ण होते आणि दिवसभर काम करताना थकवा मुळीच जाणवत नाही. आपण सगळे चहा पितो. आलं, तुळस, दालचिनी, गुलाब, इत्यादी विविध प्रकाराचा चहा आपण पितो. पण तुम्ही कधी बदामाचा चहा प्यायला आहे का? बदामाचा चहा पिण्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. बदामाचा चहा पिण्याचे फायदे आणि तो कसा बनवायचा ते जाणून घेऊया. 


बदामाचा चहा पिण्याचे फायदे काय आहेत


1. फायबर, मोनोसॅच्युरेटेड, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट, जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम आणि इतर अनेक पोषक घटक बदामामध्ये आढळतात. हे सर्व आरोग्यासाठी फायदेशीर आहे.


2. बदामाचा चहा प्यायल्याने फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून तुमचे रक्षण होऊ शकते. फ्री रॅडिकल्समुळे सुरकुत्या, चेहऱ्यावर डाग पडणे या समस्या निर्माण होतात. बदामाचा चहा पिऊन या समस्यांपासून आराम मिळू शकतो. एकंदरीत ते तुमची त्वचा दीर्घकाळ तरूण ठेवते.


3. बदामाचा चहा प्यायल्यानेही शरीर डिटॉक्स (Detox) होते. यामुळे शरीरातील विषजन्य पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. घातक रोग आणि संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.


4. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीरातील जळजळ कमी करू शकतात. सांधेदुखीसारख्या जुनाट आजाराचा धोकाही कमी होतो. त्यामुळे शरीराचा थकवा आणि अशक्तपणाही दूर होतो.


5. बदामाचा चहा प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. याशिवाय कोलेस्ट्रॉलची पातळीही याद्वारे नियंत्रित ठेवता येते. त्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी होतो. बदामामध्ये भरपूर मॅग्नेशियम असते जे मधुमेह असलेल्या लोकांसाठी उपयुक्त ठरू शकते.


6. संशोधनात असे आढळून आले आहे की, हा चहा नियमितपणे प्यायल्याने  लिव्हर योग्यरित्या कार्य करते. त्यामुळे किडनीचे आरोग्य देखील सुधारते. यामुळे शरीरातील मेटॅबॉलिझम बरोबर राहतो आणि वजन कमी होण्यासही मदत होते.


बदाम चहा कसा बनवावा?


बदामाचा चहा बनवण्यासाठी 10 ते 12 बदाम तीन ते चार तास पाण्यात भिजत ठेवा. आता सोललेले बदामांची मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा. पातेल्यात एक कप पाणी घाला. पाणी उकळायला लागल्यावर त्यात बदामाची पेस्ट घाला आणि हे मिश्रण 10 ते 12 मिनिटे शिजू द्या. आता मिश्रण आचेवरून उतरवा. ते गाळून घ्या आणि चवीनुसार अर्धा चमचा मध घाला आणि प्या.


इतर महत्वाच्या बातम्या


Weight Loss Formula : वजन कमी करायचंय? Water Fasting नेमकी पद्धत, फायदे आणि तोटे; सविस्तर वाचा