Mental Health : तुम्ही अतिवाचार करत आहात का? तुमच्या मनात अनेक प्रश्नासह चिंता अन् विचारांनी काहूर माजलं आहे. ऑफिस, घर कुटुंब, नोकरी, प्रवास, पैसा यासारख्या प्रश्नांचा सतत अतिविचार करत मनात नकारात्मकतेनं थैमान घातलं असेल. यासारख्या काही त्रासदायक विचारांना दूर करण्यास तुम्ही असमर्थ आहात काय? त्यासाठी तुम्ही किती अन् कसे प्रयत्न केलेत? वारंवार त्याच त्या नकारात्माक विचारात गुंतण्याइतकं त्रासदायक काहीच नाही. अतिविचारामुळे मन शांत राहत नाहीच त्याशिवाय परिणाम फक्त तुमच्या मनावरच नव्हे तर उत्पादन क्षमता आणि झोपही उडवू शकतो. परंतु, काही अभ्यासांनुसार, अतिविचारामुळे नैराश्यसह इतर मानसिक आजारही उद्भवू शकतात. आज प्रत्येक ठिकाणी मानसिक आरोग्य हा विषय महत्वाचा ठरत आहे. त्यासाठी कोणताही कारणं असू शकतात. त्यापैकीच एक कारण अतिविचार हे आहे. पण अतिविचारामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मानसिक आरोग्य हा शब्द ऐकतो किंवा वाचतो तेव्हा नकळत नकारात्मक गोष्टींचा विचार करू लागतो. पण या मानसिक त्रासातून बाहेर कसे पडायचे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
ज्यावेळी तुम्ही सतत अतिविचार करता, त्यावेळी तुमचं मन नकारात्मकतेकडे झुकलं जातं. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला नकारात्मकता दिसून येते. विचार, परिस्थिती आणि लोक सर्व काही नकारात्मक दिसतात. स्वत:लाही सतत नकारात्मक समजलं जातं. पण तुमच्यात इच्छाशक्ती असेल मन कणखर असेल तर या गुंतागुंतीच्या अतिविचारांमधून सहज बाहेर पडता येऊ शकतं असं तज्ज्ञ सांगतात. अतिविचार करणं हे मोठं संकट असून त्याचे अनेक धोके आहेत. त्यामुळे त्यावर वेळीच उपचार करणं महत्वाचं आहे. अतिविचार करणं हा मानसिक आजार नाही. मात्र, सतत अतिविचार केल्यामुळे मानसिक आजार होऊ शकतो. अतिविचारामुळे मुलांमध्ये पीटीएसडी (Posttraumatic stress disorder ) चा धोका संभावतो. मानसशास्त्रज्ञ गरीमा जुनेजा यांनी अतिविचार आणि मानसिक आजार यासंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
अतिविचाराचे धोके काय?
अतिविचाराचा परिणाम मानसिक आरोग्यवर होतेच. त्यामुले तुमच्या कामावरही त्याचा परिणाम जाणवतो. अतिविचारामुळे निर्माण होणाऱ्या कोर्टिसोल हार्मोनमुळे मेंदूच्या कनेक्टिव्हीटीवरही परिणाम होतो. सतत विचार केल्याने तणाव, चिंता, मुड स्विंग्स यांसारख्या मानसिक समस्या उद्भवतात. त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. यामुळे पोटात जळजळ, बोवेल सिंड्रोम, गॅस्टिक सिक्रेशन, आतड्यांची अकार्यक्षमता यांसारखअया समस्यांना आमंत्रण मिळते. अतिविचारामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता वाढते. तुम्ही लोकांपासून स्वत:ला दूर ठेवायला लागतात. लोकांशी बोलणं टाळता. एकटेएकटे राहायला सुरुवात करताl. सतत अतिविचार केल्यामुळे झोप पूर्ण होतं नाही, त्यामुळे उत्पादक क्षमतेवरही परिणाम होतो. कामावरही परिणाम होतो. वेळ वाया घालवण्याची समस्याही वाढते. अतिविचार केल्यामुळे मानसिक आजारासह अनेक धोकादायक परिणाम होतात. यावर वेळीच उपाय करायला हवा. समस्येची जाणीव झाल्यानंतर लगेच यावर उपाय शोधायला हवा...
मानसिक आजारावर कशी मात कराल?
विचार करण्याची पद्धत बदला. नकारात्मक विचारांना थांबवा. अतिविचारपासून सुटका करण्यासाठी वारंवार तुम्हाला स्वत:ला पॉझिटिव्ह विचार करावे लागतील.
नकारात्म विचार येत असतील तर पाच तुमच्या पाच इंद्रियांवर लक्ष केंद्रित करा.
अतिविचाराने नकारात्मकता येत असेल तर डोळे बंद करुन दीर्घ श्वास घ्या अन् सोडा...
आपल्या कामातील सुधारणावर भर द्या...
एक डायरी करा... त्यामध्ये दररोजची नोंद ठेवा. त्यासोबत सकारात्मक विचार लिहा, ज्याने तुमचं मन प्रसन्न होईल अन् पॉझिटिव्हिटी येईल.
भूतकाळात अथवा भविष्यकाळात जास्त काळात जास्त रमू नका.
मित्रांशी अथवा जोडीदारासोबत मनमोकळेपणाने बोला.