Weight Loss Without Exercise : अनेक लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. वजन कमी करण्यासाठी नियमीत डाएट आणि व्यायाम अनेक लोक करतात. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी जिम लावतात. जिममध्ये जाऊन एक्सरसाइज केल्याने वजन कमी होऊ शकते असे अनेकांचे मत आहे. पण व्यायाम न करता देखील तुम्ही वजन कमी करू शकाता. जाणून घ्या ही सोपी ट्रिक
जंक फूड आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा
वजन कमी करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये हेल्दी पदार्थांचा समावेश करा. तेलकट पदार्थ आणि जंक फूडमुळे वजन वाढते. आहारामध्ये वेगवेगळ्या फळांचा समावेश करा. तसेच पॅक फूड खाऊ नये.
शरीरात पाण्याचे प्रमाण वाढवा
पाणी जास्त पिल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होते. सकाळी उठल्यानंतर लगेच पाणी पिल्याने शरीरातील अॅसिडीटी कमी होते. तसेच सकाळी पाणी प्यायल्याने पचन क्रिया देखील सुधारते. जर तुम्ही डायटिंग करत असाल तर तुम्ही साकाळी रिकाम्या पोटी पाणी पिले पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरीरातील मेटाबॉलिक रेट वाढेल.
स्वत: तयार करा जेवण
दुसऱ्यांनी तयार केलेले जेवण खाण्यापेक्षा स्वत: तयार केलेले जेवण जेवा. त्याचे कारण असे आहे की, जर तुम्ही स्वत: तयार केलेले जेवण जेवलात तर तुम्ही मसाल्याचे त्यामध्ये प्रमाण व्यवस्थित टाकू शकता. तुम्हाला जे पदार्थ योग्य वाटतील त्याच पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी स्वत:चे जेवण स्वत:च तयार करा.
dry fruit paratha : घरच्या घरी झटपट बनवा; हेल्दी आणि टेस्टी ड्राय फ्रूट पराठा
झोप पूर्ण करा
जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर त्याचा परिणाम देखील तुमच्या वजनावर होतो. झोप पूर्ण न झाल्याने हार्मोनल बदल होतात. त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित
टिप- वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.