Health Tips : 'मेंदूज्वर' (Meningitis) हा मेंदूशी संबंधित आजार आहे. त्याचा मेंदूवर परिणाम होतो. मेंदुज्वरमध्ये, मेंदूभोवती तसेच पाठीच्या कण्याभोवती द्रव आणि पडदा असतो त्यामुळे सूज येते. या पडद्यांना मेंदुज्वर म्हणतात. मेंदुज्वरच्या या आजारामुळे मुख्यतः डोकेदुखी होणे, ताप येणे आणि मान ताठ होते. पण त्याची सुरुवात कशी होते हा सर्वात मोठा प्रश्न आहे. हे टाळण्याचा उपाय काय आहे हे देखील कळेल?


मेंदूज्वरची कारणं


बॅक्टेरियल, मेंदुज्वरमध्ये जीवाणू रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि मेंदू आणि पाठीच्या कण्यापर्यंत पोहोचतात. बॅक्टेरियल मेंदुज्वरची अनेक कारणे आहेत. यामुळे बॅक्टेरियल सायनस आणि न्यूमोनिया देखील होऊ शकतो. 


क्रॉनिक मेंदुज्वर


क्रॉनिक मेंदुज्वर बराच काळ शरीरात राहतो. मेंदुज्वर ट्यूबरक्युलोसिस हळूहळू संपूर्ण शरीराला विळखा घेतो. त्याचा मेंदू आणि पाठीच्या हाडांजवळील पडद्यावर खूप परिणाम होतो. क्रॉनिक मेंदुज्वर विकसित होण्यासाठी साधारण दोन आठवडे किंवा त्याहून अधिक वेळ लागू शकतो. याशिवाय, इन्फ्लूएंझा व्हायरसमुळे देखील होऊ शकतो. त्यानंतर हा तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचू शकतो. 


मेंदुज्वर होण्याची कारणे


मेंदुज्वर होण्याची अनेक कारणे असू शकतात. मूल आईच्या पोटात असताना आणि त्या वेळी योग्य काळजी न घेतल्यास हर्पस सिम्प्लेक्स विषाणू, एचआयव्ही, गालगुंडाचे विषाणू, वेस्ट नाईल विषाणू, मेंदुज्वर गर्भाच्या माध्यमातून होऊ शकतात. 


मेंदुज्वरची लक्षणं कोणती? 


मेंदुज्वरामुळे शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसू लागतात. जसे की, जास्त ताप येणे, मेंदूचा संसर्ग. याशिवाय पाठीच्या कण्याला सूज येणे, डोकेदुखी, घशात जडपणा जाणवणे, उलट्या होणे, चक्कर येणे, भूक न लागणे यांसारखी अनेक लक्षणे दिसू लागतात. 


मेंदुज्वर टाळायचा असेल तर 'या' गोष्टी करा


जर तुम्हाला मेंदुज्वर टाळायचा असेल तर स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. जसे की, वेळोवेळी हात स्वच्छ करा, खोकताना आणि शिंकताना तोंड झाका. जीवाणू किंवा विषाणू तोंडात जाणार नाहीत याची काळजी घ्या. खोकणे, शिंकणे किंवा खाण्याची भांडी ,सिगारेट शेअर केल्याने देखील मेंदुज्वर वाढू शकतो. तसेच, लहान मुलांना लसीकरण करणे आवश्यक आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : 'या' आजारांपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर स्तनपान नक्की करा; आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर