Alcohol Side Effects on Body : आतड्यासंबंधित समस्या निर्माण झाल्यास पचनावर (Digestion) परिणाम होतो आणि अनेक आजारांना आमंत्रण मिळते. आतड्यांसंबंधी समस्यांमुळे, पचनाच्या समस्या सुरू होतात, ज्यामुळे भविष्यात अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला आतड्यांसंबंधी समस्या असतील तर, तुम्ही खाण्याच्या सवयींबद्दल खूप काळजी घेणं आवश्यक आहे. अशा व्यक्तींनी दारूपासून दूर राहणं उत्तम. कारण अल्कोहोलचे सेवन केल्यास आतड्यांसंबंधी समस्या गंभीर ठरु शकतात.


अल्कोहोलचे सेवन आतड्यासाठी नुकसानकारक


अनेक लोकांना आतड्यांमध्ये सूज येण्याची समस्या असते. याला अल्सरेटिव्ह कोलायटिस असं म्हणतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. संशोधकांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ  आतड्यातसूज येण्याची समस्या असेल तर आतड्यांचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.


आतड्यांचे आरोग्य उत्तम राखण्यात मोठी भूमिका कुणाची?


आपल्या शरीरासह आतड्यातही लाखो चांगले बॅक्टेरिया असतात, जे आतड्याचे आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अल्कोहोलचे सेवन केल्याने पोटात वेगाने गॅस तयार होतो. यामुळे चांगल्या बॅक्टेरियाचे संतुलन बिघडते आणि जिवाणूंची वाढ होण्याची शक्यता वाढते. यामुळे आतड्यात एंडो टॉक्सिन निर्माण होते. त्यानंतर, पोटातील श्लेष्मा पेशी खराब होऊ शकतात. काही प्रकरणांमध्ये, पोटात सूज किंवा फोड असू शकतात. अशा परिस्थितीत पोट, यकृत, तोंड आणि स्तनाचा कर्करोग होण्याचा धोकाही वाढतो.


कर्करोगाचा धोका


जागतिक आरोग्य संघटनेने इशारा देत म्हटलं आहे की, अल्कोहोलचे सेवन केल्याने आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. तुम्ही किती मद्य सेवन करता यामुळे काही फरक पडत नाही, असंही निवेदनात सांगण्यात आलं आहे. अल्कोहोलचा एक थेंब प्यायल्यापासून कॅन्सरचा धोका सुरू होतो. त्यामुळे, जर तुम्हाला आतड्याचे आजार असतील तर तुम्ही दारूपासून पूर्णपणे दूर राहिलं पाहिजे.


'या' गोष्टींचे सेवन करणं फायदेशीर?


जर तुम्हाला आतड्यांसंबंधी समस्या असतील तर, तुम्ही प्रोबायोटिक्स ड्रिंकचे सेवन करू शकता. याशिवाय एवोकॅडो स्मूदीचे सेवन करणं तुमच्यासाठी उत्तम ठरू शकतं. यासाठी तुम्ही आयुर्वेदिक उपायही करु शकता. यासाठी तुम्ही दालचिनी किंवा जिऱ्याचं पाणी पिणं लाभदायी ठरेल. दरम्यान, आहारात काहीही समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Liquor Price : दारुच्या बाटलीची खरी किंमत किती? किती रुपये जास्त देऊन दारु खरेदी करता माहीत आहे का?