Betel Leaf Paan : पान हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात घराघरात पान खाल्ल्यालं दिसेल. पानाचा वापर लग्नापासून ते सणांपर्यंत अनेक उत्सवांमध्ये केला जातो.  उत्तर प्रदेश असो अथवा अन्य कोणतेही राज्य.. प्रत्येक ठिकाणी पान खाल्लं जातं. पानावर तर गाणेही आलेय. खाइके पान बनारस वाला.... हे गाणं ऐकताना किंवा गावात एखादा व्यक्ती पान खाताना तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का? की हेच पान का खाल्लं जातं. इतर दुसऱ्या झाडाचं पान का खाल्लं जात नाही. जगात इतरही पाने आहेत. ती का खाल्ली जात नाहीत? त्यावर कात, चुना आणि सुपारी टाकूनही ते खाऊ शकतात. चला जाणून घेऊया फक्त हेच पान का खाल्ली जाते.


फक्त खाण्याचं पानचं का खाल्लं जातं ?


प्राचीन काळात पान खाणे म्हणजे अत्यंत शाही मानले जात होतं. कवी, संगीतकार, राजे, महाराजे, शाही दरबारी हे सर्वजण सोबत पान घेऊन जात होते. आजही अनेकजण जेवणानंतर पान खातात... पण पान खान्याची नेमकी सुरुवात कधी झाली, याबाबत ठोस माहिती नाही. पण काहींच्या मते, मुघलांच्या काळात पान खाण्याची प्रथा सुरु झाली. त्याआधी पानामध्ये बडीशेप अथवा इलायची टाकून जेवणानंतर खाल्लं जायचं. पण मुघलांच्या काळात सुपारी, कात अन् चुना लावून पान खाल्लं जाऊ लागलं.  मुघलांच्या नंतर, ब्रिटीशांच्या काळातही असाच वापर होत राहिला. नंतर ते माऊथ फ्रेशनर म्हणून वापरले जाऊ लागले.


पान खान्याचे फायदे काय ?


जेवनानंतर पान खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. हे खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी सारख्या समस्या दूर होतात आणि त्यासोबत अल्सरसारखे आजारही सुपारीच्या पानांनी बरे होतात. हिरव्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे मधुमेह नियंत्रित करण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करतात.  फक्त पानामुळे चव येत नाही, म्हणून त्यात कात, चुना आणि सुपारी टाकून खाल्लं जाते.


धार्मिक मान्यता आहे का ?


पानांबाबत सनातन धर्मात काही मान्यता आहेत. असे म्हणतात की, समुद्र मंथनाच्या वेळी देवतांनी सुपारीच्या पानांचा वापर करून भगवान विष्णूची पूजा केली. आजही पूजाविधीमध्ये सुपारी आणि पानांना खूप महत्त्व आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.