Home Remedies For Acidity: सध्या अनेक लोक आहाराकडे दुर्लक्ष करतात. आहारात जंक फुड तसेच तिखट पदार्थांचे सेवन केल्यानं अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. लाईफस्टाईलमुळे तसेच जंक फूड अधिक प्रमाणात खाल्यानं अॅसिडिटी (Home Remedies For Acidity) होऊ शकते. ओव्हर इटिंगमुळे देखील बऱ्याच लोकांना अॅसिडिटी होते. अनेकांना सतत अॅसिडिटीची समस्या जाणवते.  अॅसिडिटीची समस्या जाणवत असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय ट्राय करु शकता.


कच्चे दूध प्या 
अॅसिडिटी घालवायची असेल तर कच्चे दूध प्या.अॅसिडिटीची समस्या तुम्हाला सतत जाणवत असेल तर एक ग्लास कच्चे दूध प्या. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल.


गूळ
गुळामुळे पोटातील उष्णता कमी होते. अॅसिडिटी होत असेल तर गूळ खा. गूळ खाल्ल्यानंतर एक ग्लास पाणी किंवा थंड दूध प्या. 


जिरे आणि ओवा
अ‍ॅसिडिटीची समस्या जाणवत असेल तर जिरे आणि ओवा तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला फक्त  जिरे आणि ओवा यांना तव्यावर भाजून घ्यायचे आहे. ते थंड झाल्यावर काळे मीठ टाकून खावे. या एका डोसाने तुमची अॅसिडिटी कमी होईल. 


आवळा
आवळ्यामध्ये अनेक पोषक तत्वे असतात. ज्यामुळे अॅसिडिटी कमी होते. आवळा हा काळ्या मिठासोबत खाल्यानं अॅसिटिडी कमी होते. बडीशेप, धने, जिरे यांची पूड जेवणानंतर घेतल्याने अॅसिडिटीचा त्रास होणार नाही.


बडीशेप


अ‍ॅसिडिटीपासून झटपट आराम मिळवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे एक चमचा बडीशेप खाणे आणि नंतर दोन-तीन घोट कोमट पाणी पिणे. याने तुम्हाला त्वरित आराम मिळू शकतो.


 कशामुळे होते अॅसिडिटी? 


जास्त प्रमाणात तिखट पदार्थांचे सेवन केल्यानं अॅसिडिटी होते. तसेच जागरण केल्यानं देखील तुम्हाला अॅसिडिटी होऊ शकते. मसाल्याचे पदार्थ तसेच शेंदाणे, अक्रेड, चॉकलेट हे जास्त प्रमाणात खाल्यानं आणि जागरण केल्यानं अॅसिडिटी वाढते. सतत अॅसिडिटी होत असेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच आहारात फळांचा समावेश करणं देखील गरजेचे आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Health Tips : अंगदुखीचा वारंवार त्रास होतोय? तर सावध राहा; तुम्हाला फायब्रोमायल्जिया सिंड्रोम असू शकतो; जाणून घ्या या आजाराबद्दल