पुणेगरोदरपणात उच्च जोखीमेमध्ये आई किंवा बाळाला किंवा कधी कधी दोघांनाही सामोरे जावे लागू शकते. ह्या समस्या गर्भधारणेपूर्वी असू शकतात किंवा 9 महिन्यात केंव्हाही येऊ शकतात. जसे कि मधुमेह (डायबेटीस) हा आजार गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणेमध्ये किंवा नंतरही असू शकतो. पुण्यातील डीपीयू प्रायव्हेट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल स्त्रीरोग तज्ञ डॉ.  विद्या गायकवाड यांनी  गरोदरपणात महिलांना होणाऱ्या उच्च जोखीम कोणत्या याबाबत सविस्तर माहिती दिली. 


उच्च रक्तदाब (हायरटेन्शन) सुद्धा गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भधारणे मध्येही निर्माण होऊ शकतो. हे दोन्ही आजार जास्त वयोगट म्हणजे ३५ वयोगटापुढील महिलांमध्ये मोठया प्रमाणात आढळून येते. काही वर्षांमध्ये यापेक्षा कमी वयामध्ये सुद्धा प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. त्याचसोबत अतिलठ्ठपणा (ओबेसिटी) ही होऊ शकते. याची कारणे मुख्यतः बदलती जीवनशैली आहे. यामध्ये आहारामध्ये आमूलाग्र बदल झाल्यामुळे हे आजार आपल्याला होत असताना पाहायला मिळत आहेत. आणि यावर निदान करण्यासाठी विशेषज्ञांची गरज लागते. मधुमेह २ प्रकारची असू शकतात एक गर्भधारणेच्या आधीचा आणि गर्भधारांमध्ये ७ व्या महिन्यानंतर. आणि या दोन्हीचं प्रमाण ३५ वर्षावरील महिलांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळतो. त्यानंतर उच्च रक्तदाब (प्रिक्लेमशा) हा सुद्धा गर्भधारणेच्या आधीचा आणि गर्भधारांमध्ये ७ व्या महिन्यानंतर निर्माण होऊ शकतो. आणि यामुळेच अधिक समस्या निर्माण होऊ शकतात. उच्च रक्तदाबाममुळे मेंदूमध्ये रक्तस्त्राव होणे, वार लवकर सुटणे, अति रक्तस्त्राव होणे ह्या अधिकच्या गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. किंवा गरोदर महिलेला फिट्स येणे  (एपिलेप्सी) यामुळे अधिकच्या समस्यांसोबत  बाळाला तर धोका असतोच पण त्या आईलाच्या जीवालाही धोखा असतो. अशावेळी त्या आईला अतिदाक्षता विभागामध्ये (ICU) मध्ये भरती करावी लागते.


याची लक्षणे कशाप्रकारे ओळखता येतील?


खरंतर हे धोखे उद्भवू नयेत यासाठी काय काळजी घेता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रिकन्सेप्शन कौन्सिलिंग उपयुक्त ठरते. म्हणजे गर्भधारणा होण्या अगोदरच आपलं वजन नियंत्रणात आहे का? मधुमेह आहे का? आपला रक्तदाब तर वाढलेला नाहीये याची तपासणी करून घेणे आणि ह्या स्थिती सगळ्या  घेणे आणि असेल तर ह्या सगळ्या स्थितीमध्ये तपासण्या उपलब्ध आहेत. प्रिकन्सेप्शन कौन्सिलिंग मध्ये या सगळ्या तपासण्या करून त्यानुसार आपल्याला योग्य निदान करून आटोक्यात आणू शकतो. 


यावर कशाप्रकारे मत करता येईल?


प्रिकन्सेप्शनल कौन्सिलिंग करणे सर्वात महत्वाचे ठरते. हे जे धोखे आहेत ते आधीच म्हणजे गर्भधारणे पूर्वी ओळखता यावेत यासाठी, कारण जर ब्लड प्रेशर सामान्य नसेल, रक्तातील शर्करेचे प्रमाण सामान्य नसेल तर त्या बाळाला व्यंग निर्माण होऊ शकते. कारण, पहिल्या ३ महिन्यामध्ये बाळाचे अवयव निर्माण होत असतात. त्यामध्ये मेंदूचे विकार होऊ शकतात, हृदयाचे दोष निर्माण होऊ शकतात . त्यामुळे हे प्रिकन्सेप्शनल कौन्सिलिंग खूप महत्वाचे असतात. आणि समजा अनेमिया असेल तर, त्याचा परिणाम दोघांवरही होतो. बाळाची वाढ खुंटू शकते. आणि जर बाळाची वाढ खुंटली तर अपुऱ्या वजनाचे बाळ जन्माला येऊ शकते. 


गर्भधारणेनंतर 7 व्या महिन्यानंतर जर रक्तदाब वाढला तर बाळाला होणार  रक्तपुरवठा अपुरा होऊ शकतो. आणि रक्त पुरवठा अपुरा झाला तर प्राण वायू म्हणजे ऑक्सिजन आणि अन्न पुरवठा जो बाळाच्या योग्य वाढीसाठी आवश्यक आहे तो होऊ शकणार नाही. ऑक्सिजन आणि आहार पोचवण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो यामुळेच बाळाची वाढ खुंटू शकते. अशा बाळांना जन्मानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बाळाला गर्भाशयात असताना योग्य पोषण होणे गरजेचे आहे.