Heart Attack and Stroke Risk : न्याहारी (Breakfast) आणि रात्रीचे जेवण (Dinner) हे अतिशय महत्त्वाचे आहे. माणसाला दिवसभर ऊर्जा मिळण्यासाठी न्याहारी आणि रात्रीचे जेवण शरीराची झीज भरून काढण्यासाठी मदत करते. रात्री उशिरा जेवल्याने हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आणि पक्षाघाताचा (Stroke) धोका वाढतो, अशी धक्कादायक बाब संशोधनात समोर आली आहे. तज्ज्ञांच्या मते, नाश्ता आणि रात्रीच्या जेवणाची ठराविक वेळ असते आणि ही योग्य वेळी पाळणे गरजेचं आहे. नाहीतर हदविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. ही चिंताजनक बाब संशोधनात समोर आली आहे. एक लाखांहून अधिक लोकांवर केलेल्या संशोधनातून हे सिद्ध झालं आहे.


या संशोधनाच्या अहवालानुसार, नाश्ता आणि रात्रीचे जेवण लवकर केल्याने हृदयविकार टाळण्यास मदत होते. नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवाल ही माहिती देण्यात आली आहे. या संशोधनात एक लाखांहून अधिक लोकांच्या 7 वर्षांच्या माहितीचं पुनरावलोकन करून निष्कर्ष काढण्यात आले आहेत. 


संशोधनात काय आढळलं?


एक लाख लोकांच्या संशोधनात हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसह हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगांची सुमारे 2000 प्रकरणे आढळली. या संशोधनात असे आढळून आले आहे की, दिवसाचे पहिले जेवण म्हणजे न्याहारी केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. नाश्त्याला उशीर केल्यास प्रत्येक अतिरिक्त तासामुळे सेरेब्रोव्हस्कुलर रोगामध्ये सहा टक्के वाढ होते हे संशोधनात स्पष्ट झालं आहे. एखाद्या व्यक्तीने दिवसातून किती वेळा खाल्लं यावर कोणताही धोका आढळून आला नाही. संशोधनात असे दिसून आले आहे की, दररोज जेवणाची संख्या कितीही असली, त्याचा धोकादायक परिणाम होत नाही. सोप्या भाषेत तुम्ही दिवसभरात किती वेळा याचा शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही, पण जेवणाची योग्य वेळ महत्वाची आहे.


जेवणाची वेळ


संशोधनानुसार, रात्रीचे जेवण रात्री 9 नंतर खाल्ल्याने स्ट्रोक किंवा ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक (TIA) चा धोका 28 टक्क्यांपर्यंत वाढतो. याचं कारण म्हणजे रात्रीचे जेवण जर रात्री उशिरा खाल्ले तर, रक्तातील साखर आणि रक्तातील साखरेचे प्रमाण पचनक्रियेमुळे वाढते. परिणामी रक्तदाब वाढतो. यामुळे स्ट्रोक किंवा अटॅकचा धोका संभवतो. जास्त रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांना आणखी नुकसान होऊ शकते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. मात्र, यावर आणखी सखोल संशोधनाची गरज आहे. महिलांना याचा जास्त धोका आहे. संशोधनात सामील झालेल्या लोकांपैकी 80 टक्के महिला आहेत. जेवणाच्या वेळेचा पुरुषांवर कमी प्रमाणात परिणाम झालेला दिसतो. अहवालात नोंदवलेल्या माहितीनुसार, जर पुरुषांनी उशीरा नाश्ता केला तर त्यांच्यात कोरोनरी हृदयरोगाचा धोका 11 टक्क्यांनी वाढतो.


रात्री उपवास


रात्री बराच वेळ उपाशी राहण्याचे काही फायदेही संशोधनात दिसून आले आहेत. जर कोणी रात्री उपवास करत असेल तर, प्रत्येक एका अतिरिक्त तासाला स्ट्रोकचा धोका 7 टक्क्यांनी कमी होतो.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Women Health : स्रियांनो! 'या' 8 लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात, गंभीर आजाराचा धोका