Women Health Tips : महिला (Women) वर्किंग वूमन असो किंवा गृहिणी त्यांना इतकी कामं असतात की, त्या बहुतेकदा स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. बहुतेक स्त्रिया घरच्या आणि ऑफिसच्या कामात इतक्या व्यस्त होतात की, त्यांना स्वतःची काळजी घ्यायला वेळच मिळत नाही. खाण्यापिण्याच्या योग्य सवयींकडे दुर्लक्ष करतात. या निष्काळजीपणामुळे महिलांना गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. महिलांनी शरीरात दिसणाऱ्या कोणत्याही वेगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. ही धोक्याची घंटा आणि गंभीर आजाराची लक्षणं असू शकतात. 


महिलांच्या शरीरात दिसणारी काही लक्षणांकडून दुर्लक्ष न करता वेळीच सावध व्हा. याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात महिलांना अनेक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. याबाबत अधिक माहिती वाचा.


महिलांनी चुकूनही 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये


अशक्तपणा


शरीरात अचानक अशक्तपणा स्ट्रोकची लक्षणे असू शकतात. याशिवाय स्ट्रोकच्या इतर लक्षणांमध्ये अचानक गोंधळणे, अस्पष्ट बोलणे, अस्पष्ट दृष्टी आणि चालण्यात अडचण येणे, या लक्षणांचा समावेश होतो.


मासिक पाळीत बदल


मासिक पाळीत किरकोळ बदल होणे हे सामान्य आहे, पण तुम्हाला जास्त बदल जाणवत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. मासिक पाळीचे प्रमाण, वेळ आणि फ्लो यामध्ये काही बदल झाल्यास तुम्ही डॉक्टरांशी संपर्क सादा. जर तुम्हाला मोनोपॉजनंतरही रक्तस्त्राव होत असेल, वेळीच डॉक्टरांरांचा सल्ला घ्या.


छातीत दुखणे


छातीत दुखणे, हृदयाचे ठोके जलद होणे, हात, खांदे आणि जबड्यात दुखणे यासह श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.


श्वास घेण्यात सतत त्रास


जेव्हा आपल्या हृदयाला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा आपल्याला श्वास घेण्यात अडचण येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. आम्ही तुम्हाला सांगतो की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना सायलेंट हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो, ज्याची दोन मुख्य लक्षणे म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे आणि अत्यंत थकवा येणे. अशक्तपणा आणि फुफ्फुसाच्या आजारामुळे महिलांना श्वास घेण्यासही त्रास होतो.


दृष्टी कमी होणे


वयोमानाप्रमाणे दृष्टी कमी होऊ लागते. पण, अचानक तुम्हाला दोन्ही डोळ्यांची दृष्टी कमी झाली असेल तर, हे स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. मायग्रेनने असलेल्या महिलांना चमकणारे दिवे दिसू शकतात. हे तुमची डोळयातील पडदा फाटल्याचं किंवा वेगळं झाल्याचं लक्षण असू शकतं. ही समस्या सोडवली नाही तर तुम्ही कायमचं अंधत्व येज्ञ शकतं.


वजनात बदल


कोणत्याही कारणाशिवाय वजनात अचानक बदल होणे ही गंभीर समस्या दर्शवते. थायरॉईड, मधुमेह, मानसिक विकार, यकृताचे आजार आणि कर्करोग यासारख्या आजारांचं लक्षणं असू शकते.


तणाव आणि चिंता


जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला तणावाचा सामना करावा लागतो, पण याकडे दुर्लक्ष करता कामा नये. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमची तणावाची पातळी इतकी वाढली आहे आणि ते हाताळणे तुम्हाला कठीण जात असेल. तसेच त्यामुळे तुमच्या दैनंदिन कामात अडचणी येत आहेत, तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.


स्तनामध्ये गाठ


महिलांना स्तनांमध्ये गाठ जाणवणे सामान्य गोष्ट आहे. पण जर तुम्हाला स्तनांमध्ये किंवा स्तनाच्या त्वचेवर काही गाठ दिसल्या किंवा त्वचेसह स्तनाग्रांच्या रंगात बदल दिसला तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. हे स्तनाच्या कर्करोगाचं लक्षणं असू शकतं.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Guava Leaves Benefits : त्वचा, तणाव आणि पचनासंबंधित समस्यापासून सुटका; पेरुच्या पानांचे आरोग्यदायी फायदे माहितीयत?