Curry Leaves: आपल्या स्वयंपाक घरातील काही पदार्थ आपल्या आरोग्यासाठी वरदान ठरतात. पण अनेकदा अशा पदार्थांकडे आपलं दुर्लक्ष होतं. त्यापैकीच एक म्हणजे, कढीपत्ता (Curry Tree). आरोग्यासाठी गुणकारी असा कढीपत्ता (Healthy Diet) आपण फोडणीसाठी हमखास वापरतो, पण काहीजण याकडे दुर्लक्षही करतात. तुम्हीही असं करत असाल, तर आजपासूनच जेवताना (Health Tips) कढीपत्त्याचा वापर करायला सुरुवात करा. खाद्यपदार्थांची चव वाढवण्यासोबतच आरोग्य राखण्यासही कढीपत्त्याचा वापर करा. पण, तुम्हाला माहीत आहे का? सकाळी अनोशापोटी कढीपत्त्याचं पाणी पिण्याचे फायदे काय? जर नसतील तर या लेखात आम्ही तुम्हाला हेल्दी डिटॉक्स ड्रिंकनं (Healthy Detox Drink) दिवसाची सुरुवात करण्यासाठी कढीपत्ता कसा फायदेशीर आहे? हे जाणून घेऊयात...
कढीपत्त्याचं पाणी पिण्याचे फायदेच फायदे...
1. मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स (Rich In Antioxidants)
कढीपत्त्याचं पाणी हा दिवसाची सुरुवात करण्याचा अत्यंत उत्तम आणि आरोग्यदायी मार्ग आहे. आहारतज्ज्ञांचं म्हणणं आहे की, अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असं कढीपत्त्याचं पाणी शरीराला ऊर्जा देतं, पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं आणि मेटाबॉलिज्म वाढवण्यासही मदत करतं.
2. केसांचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर (Beneficial For Hair Health)
कढीपत्त्याचे गुणधर्म केसांसाठी टॉनिकचं काम करतात. आहारतज्ञांच्या मते, हे केसांची मूळं मजबूत करण्यासाठी मदत करतात. केसांच्या वाढीसही कढीपत्ता फायदेशीर ठरतो. कमी वयातच तुमचे केस पांढरे होऊ लागले असतील, तर कढीपत्ता तुमची ही समस्या दूर करण्यास मदत करतो. तसेच, टाळूचं पोषण देखील वाढवतो, केस चमकदार आणि मुलायम बनवण्यास फायदेशीर ठरतो.
3. पचनक्रिया सुधारते (Improves Digestion)
कढीपत्त्यामध्ये पचनक्रिया सुधारण्यासाठी आवश्यक असणारे घटक असतात. यामध्ये पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी आवश्यक असणारे, एंजाइम असतात जे आतड्यांसंबंधित समस्या दूर करण्यासाठी मदत करतात.
4. ताण - तणाव कमी करा
कढीपत्त्याच्या आनंददायी हर्बल सुगंधाचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. तसेच, कढीपत्त्याचं पाणी प्यायल्यानं स्नायू आणि मज्जातंतूंना आराम मिळतो, ज्यामुळे मनःशांती वाढते. यामुळे तणावापासून आराम मिळतो.
5. कोलेस्ट्रॉल कमी करा (Lower Cholesterol)
कढीपत्ता हे अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स आणि फिनोलिक कम्पाउंड यांसारख्या संरक्षणात्मक वनस्पती पदार्थांचं भंडार आहे. हे पदार्थ अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात, जे शरीरातील उच्च कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड पातळीसारख्या समस्या कमी करून हृदय निरोगी ठेवू शकतात.
कढीपत्त्याचं पाणी कसं तयार कराल?
कढीपत्त्याचं पाणी तयार करणं अत्यंत सोपं आहे. त्यासाठी मुठभर कढीपत्त्याची पानं घ्या आणि गरम पाण्यात भिजत ठेवा. काही वेळ ठेवल्यानंतर हे पाणी गाळून घ्या. कढीपत्त्याचं पाणी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. शरीरातील दूषित तत्व बाहेर टाकण्याचं काम कढीपत्त्याचं पाणी करतं. यामध्ये व्यक्तींमध्ये गॅस्ट्रिक अस्वस्थता किंवा अॅलर्जीक रिअॅक्शनचा समावेश होतो.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Health Tips : भात कसा खावा, गरम की थंड? आरोग्यासाठी काय ठरेल सर्वात फायदेशीर?