Old Cooked Rice vs Fresh Rice: भारतात, उत्तर भारतापासून (North India) दक्षिणेपर्यंत (South India), भात (Rice) ही अशी गोष्ट आहे, जी दररोज खाल्ली जाते. भारतीय खाद्यपदार्थाचा (Indian Food) भात हा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळेच भाताला रोटीप्रमाणेच महत्त्व दिलं जातं. ताजा भात म्हणजेच, गरम भात (Fresh Cooked Rice) खाणं जास्त फायदेशीर आहे, असं अनेकांचं मत आहे. काही लोकांचा असा समज आहे की, थंड भात आरोग्यासाठी चांगला असतो. अशातच आता प्रश्न असा पडतो की, या दोघांपैकी भात कसा खाणं चांगलं? 


ताजा गरम भात खाणं चांगलं की, थंड भात खाणं चांगलं?


तज्ज्ञांच्या मते, ताज्या तांदळापेक्षा थंड भात आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. कारण थंड भातामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असतं. हे आपल्या आतड्याच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. थंड भात खाल्ल्यानं आतड्यातील बॅक्टेरिया अन्न पचण्यास मदत करतात. याशिवाय थंड भात खाल्ल्यानं शरीरातील कमी कॅलरी शोषून घेतात.




भात खाण्याची योग्य पद्धत 


भात गरम खाण्याऐवजी, जेव्हाही खाल तेव्हा थंड करुन खा. जेव्हा भात काहीसा थंड होईल, तेव्हा 5 ते 8 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. अशा पद्धतीनं भाताचं सेवन केल्यानं त्यातील पोषक तत्व वाढतात. 


पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी फायदेशीर 


भातामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. जे पचनासाठी चांगलं मानलं जातं. त्यात चांगले बॅक्टेरिया असतात. जे अन्न पचण्यास मदत करतात. भातामध्ये स्टार्च असल्यानं पचनाचा त्रास होत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठता, ॲसिडिटी, अपचन यांसारख्या समस्यांमध्ये आराम मिळतो.




शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी


भातात कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात आढळतं. जे शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतं. त्याचबरोबर तांदूळ पचायलाही हलका असतो.


भात पचायला हलका                  


थंड भात जड नसल्यामुळे तो खाल्ल्यानंतर पोट जड वाटत नाही. तसेच, पचण्यासही हलका असतो.                         


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :       


अंडी आरोग्यदायी, पण त्यातील पिवळा भाग खावा की खाऊ नये? आहारतज्ज्ञांचं म्हणणं काय?