Healthy Diet For Weight Loss : सध्याच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमुळे (Healthy lifestyle) वाढत्या वजनाचा (Weight Loss) सामना जवळपास सर्वांनाच करावा लागतोय. अनेकजण वाढलेल्या पोटाच्या घेरामुळे त्रस्त आहेत, पोटोची चरबी (How To Reduse Belly Fat?) कमी करण्यासाठी मग खूप उपाय केले जातात. कधीकधी व्यायामासोबतच बाजारात मिळणाऱ्या औषधांचाही आधार घेतला जातो. पोटावरची वाढलेली चरबी आरोग्यासाठीही धोकादायक ठरते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. वाढलेल्या वजनामुळे हाय ब्लड प्रेशर (Blood Presure), हृदयविकार (Heart Disease), मधुमेह (Diabetes) आणि कर्करोगासारखा (Cancer) गंभीर आजारही जडण्याचा धोका असतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. 


वाढलेलं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मग व्यायाम असोवा वा डाएट किंवा मग बाजारात मिळणारी औषधं. यामध्ये प्रामुख्यानं व्यायाम आणि संतुलित आहार यांचा समावेश होतो. सकाळी लवकर आपल्या आहारात प्रथिनं आणि फायबरचा समावेश केल्यास वजन कमी करण्यात खूप मदत होऊ शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याशिवाय पोटाची चरबीही कमी करण्यासाठी तुमचा नाश्ताही तुम्हाला मदत करू शकतो. नाश्त्यामध्ये तुम्ही काय खाता? याचाही तुमच्या वजनावर परिणाम होतो. 




पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वोत्तम नाश्ता कोणता?


1. इडली सांबार : आंबवलेला तांदूळ आणि उडीद डाळीच्या पिठात बनवलेल्या इडलीमध्ये फॅट्सचं प्रमाण खूपच कमी असतं. तसेच, इडलीसोबत येणारा मसूर आणि विविध भाज्यांचा समावेश असलेला पौष्टिक सांबार सोबत खा. जर तुम्ही सकाळी हा नाश्ता केला तर तुम्हाला दुपारपर्यंत भूक लागणार नाही, ज्यामुळे कॅलरीजचे प्रमाणही कमी होऊ शकते.


2. दलिया खिचडी : दलिया खिचडी ही कणीचा गहू, डाळी आणि भाज्यांपासून बनवली जाते. दलियामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि डाळी या प्रोटिन्सचं पॉवरहाऊस आहेत. हे दोन पदार्थ हंगामी भाज्यांसोबत खाल्ल्यास पोटाची चरबी कमी होण्यास खूप मदत होते.


3. दह्यासोबत पनीर पराठा : प्रोटीन युक्त नाश्ता खाणं वजन कमी करण्यात प्रभावी ठरतं. हा पण पनीर पराठा मैद्यापासून न तयार करता गव्हापासून बनवावा आणि त्यात किसलेलं चीज आणि आवडीचे मसाले भरून सारण तयार करावं. नाश्त्याला कमी 
फॅटयुक्त दह्यासोबत खा.


4. मुगाच्या डाळीचं धिरडं : मुगाच्या डाळीचं धिरडं भाजी सोबत खाणं हा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्यामध्ये प्रोटिन्स, फायबर आणि कॅलरीज कमी असतात. चरबी जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हा उत्तम नाश्ता आहे.




5. स्प्राउट्स चाट : हा बनवायला सोपा तर आहेच, पण खायलाही खूप सोयीस्कर आणि चविष्ट नाश्त्याचा पदार्थ आहे. कांदे, टोमॅटो आणि मसाल्यांमध्ये अंकुरलेले मूग किंवा हरभरा मिसळून एक स्वादिष्ट आणि पौष्टिक चाट तयार केलं जातं, जे आरोग्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं.


6. ओट्स : भरपूर फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्ब असलेले आट्स आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. ओटमीलमुळे पोट भरल्यासारखं वाटतं. जे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतं.


7. बेरीसह ग्रीक यॉगर्ट : ग्रीक यॉगर्ट प्रथिने समृद्ध आहे, तर बेरी अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर प्रदान करतात. हा नाश्ता चविष्ट आणि आरोग्यदायीही आहे.


8. अंडी : भरपूर प्रोटीन्स असलेली अंडी भूक नियंत्रित करण्यास आणि स्नायूंचा विकास करण्यास मदत करतात. अंड्यांमुळे फॅट्स डिझॉल्व होतात. ऑम्लेट, भुर्जी, सँडविच, पराठा अशा अनेक प्रकारे अंड्यांचा आहारात समावेश करता येतो. 


9. पालक प्रोटीन स्मूदी : पालक, फळं आणि प्रोटीन पावडरसह हिरव्या स्मूदीमध्ये भरपूर पोषक पदार्थ असतात आणि कॅलरीजही कमी असतात. यामुळे शरीराला चांगलं पोषण मिळतं आणि वजन कमी होण्यास मदत होईल. 


10. चिया सीड्स हलवा : चिया सीड्समध्ये फायबर आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडचं प्रमाण जास्त असतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील एक आरोग्यदायी पर्याय आहे.


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या बातम्या :


Pumpkin Side Effects : 'या' लोकांनी भोपळ्यापासून लांब राहिलेलंच बरं; नाहीतर उद्भवू शकतात आरोग्याच्या समस्या!