Health Tips : जेव्हा कोणाला उचकी (hiccups) लागते, तेव्हा लोक म्हणू लागतात की, कदाचित कोणीतरी तुमची आठवण काढत आहे. पण, शास्त्रज्ञांचे मत यापेक्षा वेगळे आहे आणि ते त्यामागे इतर अनेक कारणे सांगतात. चला तर, जाणून घेऊया, उचकी येण्याची कारणं आणि ते थांबवण्याचे उपाय..


असे म्हणतात की, घशाच्या नालिकेमधून उचकी येते. उचकी ही तुमच्या स्नायूंची अनैच्छिक क्रिया आहे. जेव्हा डायाफ्रामचे स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा उचकी लागते. पण, काही काळानंतर या उचक्या थांबतात. याशिवाय मसालेदार अन्न हे देखील उचकीचे कारण मानले जाते.


अनेकांना तणावात असताना किंवा खूप उत्साहात असताना अथवा भरपूर जेवण जेवले तरी देखील उचकी येऊ लागते. तथापि, आपल्याला याबद्दल जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही. काही वेळात ती स्वतःच थांबते.  पण, काही वेळा जास्त समस्या असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.


उचकी थांबवण्याचे उपाय :


* उचकी थांबवण्यासाठी थोडा वेळ श्वास रोखून धरा.


* जेव्हा तुम्हाला उचकी येत असेल, तेव्हा तुम्ही थंड पाणी पिऊ शकता.


* उचकी थांबवण्यासाठी आरामदायी जागी बसून गुडघे छातीजवळ आणा आणि दोन मिनिटे त्याच स्थितीत राहा.


* जर सतत उचकी येत असेल, तर तुम्ही तुमची जीभ बाहेर काढून उचकी थांबवू शकता.


* याशिवाय, जर तुम्ही तुमचे लक्ष उचकीवरून हटवून, काही काळ इतर गोष्टींवर केंद्रित केले, तर काही वेळातच उचक्या थांबतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha