What Not To Eat Watermelon with Salt: उन्हाळ्यात घसा कोरडा पडतो तेव्हा काय हवं असतं? फक्त एक प्लेट कलिंगड मिळालं तरी थंडावा मिळून जातो. कलिंगड केवळ शरीराला हायड्रेटेड ठेवत नाही, तर अनेक जीवनसत्त्वांची पूर्तता देखील करते. कलिंगडाचे सेवन केल्याने शरीराला उष्णतेपासून आराम मिळतो. मात्र हे कलिंगड खाताना काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे. कलिंगड कशासोबत खावे किंवा कशासोबत खाऊ नये हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे.


कलिंगडासोबत काय खाऊ नये?


बऱ्याचदा फळं खाताना लोक त्यावर थोडं साधं मीठ किंवा काळं मीठ टाकतात. त्याने फळांची चव नक्कीच सुधरते, पण त्यांच्यातील पोषक तत्त्व मात्र कमी होतात. जर तुम्हाला कलिंगडातील पोषक तत्त्वांचा फायदा घ्यायचा असेल तर चुकूनही त्यावर मीठ टाकून खाण्याचा प्रयत्न करू नका. त्यापेक्षा कलिंगडाच्या स्लाइसच्या मूळ चवीचा आनंद घ्या. मिठामुळे तुमचे शरीर कलिंगडातील सर्व पोषण ग्रहण करू शकत नाही, म्हणूनच कलिंगड खाताना किंवा खाल्ल्यानंतर लगेच मीठ किंवा मीठजन्य पदार्थ खाऊ नका.


हे खाणंही ठरू शकतं नुकसानदायक


अंडी किंवा तळलेले पदार्थ कलिंगडासोबत किंवा त्यानंतर किमान अर्धा तास खाऊ नका. टरबूज जितके रसदार असेल तितके त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. तळलेले किंवा भाजलेले पदार्थ खाल्ल्याने कलिंगडाच्या रसाचा पूर्ण फायदा मिळत नाही. अंडी आणि कलिंगड हे वेगळ्या पद्धतीने परिणामकारक आहेत, म्हणून ते एकत्र खाल्ल्याने देखील नुकसान होऊ शकते. म्हणूनच या ऋतूत तुम्ही कधीही कलिंगड खाण्याचा आनंद घ्याल, त्यानंतर किमान अर्धा तास काहीही खाऊ नका. जेणेकरून कलिंगड तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरणार नाही.


कलिंगडावर मीठ टाकून खाल्ल्याने होईल नुकसान


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कापलेल्या फळांवर मीठ शिंपडले की ते पाणी सोडू लागते. यामुळे फळांमधील पोषक तत्त्वे निघून जातात. त्याचबरोबर मीठ किंवा चाट मसाल्यामध्ये असलेले सोडियम किडनीवर परिणाम करते. जर तुम्ही फळांवर चाट मसाला आणि मीठ दोन्ही टाकून खाल्लात तर शरीरात सोडियमचे प्रमाण जास्त होते. हे शरीरासाठी नुकसानदायक आहे.


फळांवर साखर टाकून खाण्याचे दुष्परिणाम


फळ नैसर्गिकरित्या गोड असतात. फळांमध्ये ग्लुकोज असते. यामुळे फळांचे सेवन केल्याने शरीरात कॅलरीज वाढतात. अशात तुम्ही फळांवर अधिक साखर टाकून खाल्ली तर शरीरात साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे मधुमेहाची समस्या उद्भवू शकते. शिवाय शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्यासह वजनही वाढू शकते. डायबेटीजच्या रुग्णांसाठी हे फारच नुकसानदायक आहे.


हेही वाचा:


Cheese Omelette Mug: तुम्ही 'Mug ऑम्लेट' 'ट्राय केलं का?  नसेल केलं तर आजच करा